योगा करताना ‘या’ गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी

चक्कर येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ‘न्यूरो डिसऑर्डर’सारख्या गंभीर समस्या निर्माण होउ शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला योगा करताना चक्कर येण्याची कारणे सांगणार आहोत. यासोबतच यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे देखील सांगणार आहोत.

योगा करताना ‘या’ गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी
योगासने करताना काय काळजी घ्याल?
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 10:49 AM

योगासने (yoga) करणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: कोरोना काळापासून व्यायाम व योगासनांचे महत्व अधिक वाढलेले दिसते. बहुतेक लोकांना त्याचा फायदाही झाला आहे. योगा करत असताना त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा लोक काहीही शास्त्रशुध्द माहिती नसताना योगासने करायला लागतात आणि यामुळे फायद्याऐवजी त्यांना नुकसानच (side effects) अधिक होत असते. कधी-कधी योगा करत असताना चक्करही (dizzines) येऊ लागतात. यामागे इतर अनेक कारणे देखील असू शकतात जसे, की योगादरम्यान डिहायड्रेशन किंवा योगा करताना श्‍वासाचे योग्य संतुलन न राखणे आदी. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ‘न्यूरो डिसऑर्डर’सारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला योगा करताना चक्कर येण्याची कारणे सांगणार आहोत. यासोबतच यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता, हे देखील बघू.

जर तुम्ही बराच वेळ व्यायाम करत असाल आणि त्यानंतर लगेच योगासने सुरू केलीत तर तुम्हाला या स्थितीत चक्कर येऊ शकतात. तथापि, कधीकधी रक्तातील साखर कमी असतानाही चक्कर येऊ शकता. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर योगासने करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. ‘डिहायड्रेशन’च्या समस्येमुळे योगा करताना चक्कर येऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. याशिवाय, जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर चक्कर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे उपाय करा

1) पुरेशी झोप

योगासने करण्यापूर्वी चांगली झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर तुम्हाला थकवा जाणवेल आणि तुम्ही योग्य प्रकारे योगासने करू शकणार नाही. केवळ योगाच नाही तर वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वीही पूर्ण झोप घेणे खूप गरजेचे आहे.

2) श्वासाचे संतुलन करा

योगासन करताना श्वास योग्य प्रकारे घेतला नाही तर चक्कर येऊ शकते. योगा करताना नेहमी पोटातून श्वास घ्यावा असे म्हणतात. तसेच योगासनानुसार श्‍वासाचे योग्य संतुलन राखा.

3) व्यायामासाठी योग्य वेळ निवडा

योगा किंवा व्यायामासाठी योग्य वेळ निवडणे आवश्‍यक ठरते. सध्या उन्हाळा आहे आणि त्यात कधीही योगा केल्याने चक्कर येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात सकाळी लवकर योगा केल्यास ते चांगले राहते. याचे मुख्य कारण म्हणजे या काळात हवामान थोडे थंड राहते. त्यामुळे योगा केल्याने मळमळ होणार नाही.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, व्यायाम व योगा करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

इतर बातम्या

Gold-silver price: सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक, सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण

Petrol,Diesel Price: आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.