Women’s Day 2023 : PCOS म्हणजे काय ? महिलांना का होतो हा त्रास ?

PCOS हा महिलांमध्ये कोणताही आजार नाही. या हार्मोनल बदलामुळे काही समस्या निर्माण होतात. यामध्ये लठ्ठपणा, चेहऱ्यावर पिंपल्स, एमेनोरिया, स्लीप एपनिया यासारख्या समस्या उद्भवतात.

Women's Day 2023 : PCOS म्हणजे काय ? महिलांना का होतो हा त्रास ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 12:10 PM

नवी दिल्ली : महिलांचे शरीर पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असते. स्त्रियांचे शारीरिक स्वरूप आणि हार्मोन्समुळे देखील काही आजार होतात. अशीच एक समस्या जी आजार तर नाही पण ती कोणत्याही आजारापेक्षा कमी नाही. पीसीओएस (Polycystic ovary syndrome) असे या आजाराचे नाव आहे. PCOS म्हणजे काय, हे समजून घेऊ. ही समस्या पूर्णपणे हार्मोनल असंतुलनाशी (hormonal imbalance) संबंधित आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर समस्याही उद्भवू शकतात. ही समस्या खूप त्रासाचे (problems) कारण बनू शकते, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

PCOS हे नक्की काय असतं ?

PCOS ला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात. हा कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल असंतुलन आहे. यामध्ये महिलांच्या शरीरातील पुरूष हार्मोन एंड्रोजनचे संतुलन बिघडते. अनियमित कालावधी आणि एक किंवा दोन्ही अंडाशयांमध्ये 12 अमॅच्युअर फॉलिकल्स विकसित होतात.

हे सुद्धा वाचा

काय दिसतात लक्षणे ?

पीसीओएसच्या लक्षणांबद्दल सांगायचे झाले तर हा त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणा, एका ठराविक वयानंतरही चेहऱ्यावर पुरळ येणे, अमेनोरिया किंवा मासिक पाळी न येणे, अनेक ठिकाणी केसांची वाढ होणे, वंध्यत्व अशा समस्या जाणवतात. तसेच काही महिलांना अनेकदा पोट फुगण्याची तक्रार असते. तथापि, यापैकी अनेक लक्षणे इतर रोगांशी देखील संबंधित असू शकतात.

वारंवार पोट फुगण्याची समस्या का होते ?

ओव्ह्युलेशनच्या वेळी फॉलिकल्स परिपक्व होतात आणि अंडी तयार करतात. परंतु PCOS च्या समस्येमध्ये अनेक फॉलिकल्स परिपक्व होत नाहीत आणि दोन्ही अंडाशयांमध्ये एकत्र होऊ लागतात. स्त्रियांमध्ये, पुरुष हार्मोन इस्ट्रोजेन वाढू लागतो, तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन कमी होऊ लागतो. यामुळे पोटात द्रव टिकून राहते आणि वारंवार पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

गर्भधारणेत येऊ शकते अडचण

हार्मोनल असंतुलनामुळे गर्भधारणा करण्यास अडचण येऊ शकते. गरोदरपणात विशेषतः त्याची औषधे घ्यावी लागतात. तर ज्या महिला आयव्हीएफ तंत्राचा अवलंब करतात. त्यांना प्रजननक्षमतेसाठी औषधही द्यावे लागते. त्यांच्यावर काही काळ उपचार केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेतली जातात.

काय असतात उपचार ?

पीसीओएस हा कोणताही आजार नसल्यामुळे त्यावर इलाजही नाही. हा त्रास असलेल्या महिलांवर लक्षणांच्या आधारे उपचार केले जातात. पोट फुगण्याची समस्या टाळण्यासाठी सकस आहार घ्यावा. यामुळे दिलासा मिळू शकतो. त्याच वेळी, हार्मोन संतुलनासाठी डॉक्टर महिलांना काही औषधे देतात. त्याची नियमित ट्रीटमेंट घ्यावी लागते. नियमित योगासने आणि व्यायाम केल्यानेही खूप आराम मिळतो. लठ्ठपणामुळे ही समस्या गंभीर स्वरुप धारण करते. महिलांनी लठ्ठपणा कमी केला तर त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.