AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावल्यानंतर तुमच्याही हाता-पायांना येते का सूज ? होऊ शकतो हा आजार

संध्याकाळी किंवा सकाळी चालण्याचा व्यायाम केल्यानंतर अथवा जॉगिंग केल्यानंतर तुमचेही हातपाय सुजत असतील तर सावध व्हा.

धावल्यानंतर तुमच्याही हाता-पायांना येते का सूज ? होऊ शकतो हा आजार
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 9:11 AM

नवी दिल्ली : चालण्याचा व्यायाम केल्यावर, जॉगिंग केल्यावर (jogging) किंवा जिममध्ये व्यायाम (exercise in gym) केल्यावर तुमचे हात पाय सुजतात का ? तुमच्यासोबतही असे घडत असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण तुम्ही एकटे नसून तुमच्यासारखे अनेक लोक या समस्येशी झुंजत आहेत. उन्हाळा आला आहे आणि बहुतेक लोक वजन नियंत्रित करण्यासाठी व्यायाम, जॉगिंग आणि जिमचा अवलंब करत आहेत, परंतु या दरम्यान काही लोकांना हातपाय सुजण्याची (hands and legs swelling) समस्या देखील भेडसावत आहे. असं नेमकं का होतं व त्यावर उपाय काय हे समजून घेऊया.

उन्हाळ्यात सूज येण्याची समस्या जास्त वाढते

मिनेसोटा युनिव्हर्सिटी ऑफ फॅमिली मेडिसिन आणि कम्युनिटी हेल्थ विभागाचे एमडी, विल्यम ओ. रॉबर्ट्स यांनी सांगितल्यानुसार, की बाहेर वातावरण गरम असताना आपले हात अनेकदा सुजतात, परंतु हे निर्जलीकरणाचे लक्षण नाही. उलट, सुजलेले हात आणि बोटे हे हायपोनेट्रेमियाचे लक्षण असू शकतात. आपण धावताना खूप जास्त द्रव पदार्थ पितो, त्यामुळे हे उद्भवू शकते. व्यायामादरम्यान, आपले रक्ताभिसरण खूप सक्रिय होते, त्यामुळे देखील सूज येऊ शकते.

रक्ताभिसरणामुळे आपल्या हृदयात, फुफ्फुसात आणि स्नायूंमध्ये रक्त खूप वेगाने पसरते. जिथे रक्ताभिसरण कमी होते तिथे शरीर थंड पडू लागते. उदा. आपलाय हात. मग हळूहळू ते तुमच्या संपूर्ण हातभर पसरू शकते व त्यामुळे हाताला सूज होऊ शकते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे स्नायू गरम होतात. उष्णता दूर करण्यासाठी, तुमचे शरीर तुमच्या त्वचेच्या आसपासच्या नसांमध्ये रक्त प्रवाहित करते. त्यामुळे घाम येतो. यामुळे देखील तुमच्या हाताला सूज येऊ शकते.

हायप्रोफाइल ॲथलीट्समध्ये हायपोनाट्रेमिया ही एक सामान्य समस्या आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की हायपोनेट्रेमियामुळे बोटांना आणि हातांना सूज येऊ शकते.

या समस्येवर उपाय काय ?

रिपोर्ट्सनुसार, बहुतेक व्यायामाशी-संबंधित हाताची सूज टाळता किंवा कमी करता येत नाही, परंतु लक्षणे कमी करण्यासाठी काही उपाय करू शकतो

– व्यायाम करण्यापूर्वी, तुमच्या हातातील अंगठ्या काढा तुमच्या. तसेच तुमचा वॉचबँडही काढून ठेवा.

– व्यायामादरम्यान, आपले हात पुढे आणि मागे हलवा.

– व्यायामादरम्यान तुमचे हात, बोटे अनेक वेळा पसरवा, मुठी बनवा आणि आपले हात हृदयाच्या वर (उभे) करा.

– चालताना आपल्या हाताचे स्नायू आकुंचन पावावेत, यासाठी ट्रेकिंग पोल वापरा.

– फारसे घट्ट नसलेले हातमोजे घालून व्यायाम करू शकता.

– व्यायाम करताना इलेक्ट्रोलाइट सारखं एखांद थोडंस खारट, गोड पेय पिऊ शकता.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.