AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॉर्मल डिलीव्हरी चांगली की सिझेरियन ? डॉक्टरांनी सांगितला नॉर्मल डिलीव्हरीचा सर्वात मोठा तोटा, दशकभरात होते शरीराची ही अवस्था

नॉर्मल डिलीव्हरी विशेषत: फोरसेप्स डिलीव्हरीनंतर पेल्विक भागातील स्नायूंमध्ये कमकुवतपणा येण्याची शक्यता असते.

नॉर्मल डिलीव्हरी चांगली की सिझेरियन ? डॉक्टरांनी सांगितला नॉर्मल डिलीव्हरीचा सर्वात मोठा तोटा, दशकभरात होते शरीराची ही अवस्था
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 1:40 PM

नवी दिल्ली : नॉर्मल डिलीव्हरीनंतर, अनेक महिला अशी तक्रार करतात की त्यांच्या ओटीपोटाच्या भागातील स्नायू (muscles) कमकुवत झाले आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ज्या महिलांची नॉर्मल डिलिव्हरी (normal delivery) किंवा प्रसूती झाली आहे त्यांना लेबर पेन दरम्यान ओव्हर-स्ट्रेचिंगमुळे पेल्विक फ्लोअर स्नायू कमकुवत होण्याचा धोका असू शकतो. फोरसेप्स डिलिव्हरी बाबतीत हे अधिक आहे. या प्रक्रियेसाठी नॉर्मल डिलिव्हरी 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि बाळाला जबरदस्तीने बाहेर काढले जाते ज्यामुळे स्नायूंचे नुकसान होते. तथापि, सिझेरियन प्रसूती (Cesarean delivery) झालेल्या महिलांमध्ये असे घडत नाही.

पेल्व्हिक स्नायूंचे काम काय ?

डॉक्टर सांगतात की पेल्विक स्नायू हे गर्भाशय आणि मूत्राशय जागी ठेवण्यासाठी कार्य करतात आणि जेव्हा ते जास्त ताणले जातात तेव्हा मूत्राशय खाली येऊ शकते. यामुळे, मूत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यास आणि लघवी थोडी साठण्याचा त्रास होतो. यामुळे लवकर लघवी करण्याची गरज निर्माण होणे, वारंवार लघवी होणे आणि मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या समस्या प्रसूतीनंतर काही वर्षांनी, साधारणपणे दहा वर्षांनी होतात.

हे सुद्धा वाचा

अजून काय त्रास होऊ शकतो ?

याशिवाय डॉक्टरांनी असेही सांगितले की, पेल्विक फ्लोअरचे स्नायू जास्त ताणले गेल्याने लघवी थांबण्यास त्रास होतो. जेव्हा तुम्ही खोकता, हसता किंवा बाळाला किंवा एखादी जड वस्तू उचलता तेव्हा त्याचा शरीरावर ताण येतो आणि लघवी गळती होते. नॉर्मल डिलिव्हरीनंतर 10 ते 15 वर्षांनी ही समस्या सुरू होऊ शकते. वाढलेल्या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे स्त्रियांना लघवी रोखणे अधिक कठीण होते

फोरसेप्स डिलीव्हरी मध्ये होऊ शकतो असा त्रास

एनसीबीआयच्या मते, सिझेरियन प्रसूती झालेल्या महिलांच्या तुलनेत, योनीमार्गे प्रसूती झालेल्या अर्थात नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिलांमध्ये पेल्विक स्नायूंची ताकद आणि आकुंचन कालावधी कमी झाल्याचे दिसून आले. फोरसेप्स डिलिव्हरीच्या बाबतीत ही समस्या अधिक होती. सामान्य प्रसूतीनंतर, पेल्विक फ्लोरच्या स्नायूंची ताकद कमी झाली, तर सिझेरियनमध्ये अशी समस्या उद्भवली नाही.

डिलिव्हरी नंतर फरक पडतो का ?

बऱ्याच स्त्रियांना हे जाणून घ्यायचे असते की प्रसूतीनंतर त्यांच्या पेल्विक फ्लोरचे स्नायू मजबूत होऊ शकतात का? प्रसूतीनंतर तुमचे शरीर रिकव्हर होणे आवश्यक असते. यामध्ये पेल्विक फ्लोअरच्या भागातील इतर स्नायू आणि नसा यांचा समावेश होतो जे प्रसूतीदरम्यान ताणले जातात.

4 किलोपेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म दिल्यास बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. कमकुवत पेल्विक फ्लोर स्नायू किंवा मूत्राशयाची समस्या प्रसूतीनंतर पहिल्या 6 महिन्यांत मदतीशिवाय बरे होऊ शकते.

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.