Swine flu | कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूने वाढवले टेन्शन, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय!

स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. हा रोग फक्त माणसांमुळे पसरत नाहीतर हा रोग प्राण्यांमुळे देखील होतो. ज्या व्यक्तीला स्वाइन फ्लू झाला आहे, त्याने शिंकताना किंवा खोकताना हा रोग पसरतो. स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणे असल्यामुळे सुरूवातीला तो लक्षात येत नाही. 1918 मध्ये हा विषाणू सर्वात अगोदर सापडला होता.

Swine flu | कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूने वाढवले टेन्शन, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय!
Image Credit source: apa.org
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 1:56 PM

मुंबई : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकेवर काढले आहे. एका दिवसामध्ये साधारण चार हजारांपेक्षाही अधिक रूग्ण कोरोनाची सापडली आहेत. हे सुरू असतानाच आता स्वाइन फ्लूनेही पाय पसरवण्यास सुरूवात केलीये. केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूच्या (Swine flu) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. धोकादायक गोष्ट म्हणजे स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनासोबतच स्वाइन फ्लूचाही धोका सध्या देशामध्ये वाढला आहे. केरळमध्ये स्वाइन फ्लूने एका लहान मुलीचा मृत्यू झालाये तर राजस्थानमध्ये 90 हून अधिक रुग्ण हे स्वाइन फ्लूचे आढळल्याने धोका (Danger) अधिक आहे. त्यामध्येही सध्या शाळेंना सुट्टया असल्यामुळे अनेकजण राजस्थानमध्ये फिरायला गेले आहेत, यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग इतरही राज्यामध्ये होण्याची शक्यता अधिक आहे.

स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढला

स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. हा रोग फक्त माणसांमुळे पसरत नाहीतर हा रोग प्राण्यांमुळे देखील होतो. ज्या व्यक्तीला स्वाइन फ्लू झाला आहे, त्याने शिंकताना किंवा खोकताना हा रोग पसरतो. स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणे असल्यामुळे सुरूवातीला तो लक्षात येत नाही. 1918 मध्ये हा विषाणू सर्वात अगोदर सापडला होता. मात्र, 2009 मध्ये WHO ने याला संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केले. 2009 ते 2015 मध्ये भारतामध्ये स्वाइन फ्लूची अनेक प्रकरणे आढळून आली होती. ताप, खोकला, घसा दुखणे, थकवा, मळमळ, उलट्या ही प्रमुख लक्षणे स्वाइन फ्लूची आहेत.

हे सुद्धा वाचा

जास्तीत-जास्त पाण्याचे सेवन करा

बऱ्याच वेळा काही रूग्णांना स्वाइन फ्लूमध्ये श्वास घेण्यास देखील त्रास होतो. स्वाइन फ्लू दरम्यानमध्ये अँटीव्हायरल औषधांव्यतिरिक्त संसर्गाची लक्षणे कमी करणारी औषधे आवश्यक असतात. यामुळे आणि इतरांनाही संसर्ग होऊ नये म्हणून यादरम्यान आपण घराच्या बाहेर न पडता आराम करायला हवा. तसेच इतरांच्या संपर्कात येणे देखील टाळाच. शिवाय संसर्ग झाल्यानंतर भरपूर पाणी प्या. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वाइन फ्लूमध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणूनच आपण स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून प्या.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.