अति झालं की माती होणारच! खूप हसणंही धोकादायक, भावनातिरेक भोवला, दुर्मिळ आजारग्रस्त महिला 500 वेळा अ‍ॅडमिट

खूप हसणे किंवा रडणे यामुळेही कुणाचा मृत्यू होऊ शकतो असे सांगीतले तर, कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतू, हे खरे आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये एका महिलेला हा आजार जडला आहे. जाणून घ्या, काय आहे हा आजार आणि त्याचे परिणाम.

अति झालं की माती होणारच! खूप हसणंही धोकादायक, भावनातिरेक भोवला, दुर्मिळ आजारग्रस्त महिला 500 वेळा अ‍ॅडमिट
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 1:53 PM

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून रडणे आणि हसणे याचे अनेक फायदे आहेत. परंतु, जगात अशा काही आजाराने ग्रस्त (Suffering from illness) असलेल्या व्यक्ती आहेत ज्यांना हसणे आणि रडणेही महागात पडू शकते. असाच एक प्रकार इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये समोर आला आहे. 27 वर्षीय नताशा कोट्स अशाच एका आजाराशी झुंज देत आहे. मास्ट सेल अॅक्टिव्हेशन सिंड्रोम (Mast cell activation syndrome) असे या आजाराचे नाव आहे. जेव्हा-जेव्हा नताशा आजारामुळे जास्त भावूक होते, तिला अश्रु येतात किंवा ती हसते त्यावेळी तिला अंगावर लाल पुरळ उठतात. नताशाला या आजारामुळे आपल्या कुठल्याही भावना प्रकट करता येत नाही. तिने तसे केले की, तिला लगेच हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागते. नताशा ला आत्तापर्यंत तब्बल 500 वेळा हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. न करता, वेदना तीव्र होते आणि वेदना मृत्यूचा धोका (Risk of death) वाढवते.

मास्ट सेल सक्रियकरण म्हणजे काय?

अमेरिकन अकादमी ऑफ दमा, ऍलर्जी आणि इम्युनोलॉजीच्या अहवालानुसार, मास्ट सेल ऍक्टिव्हेशन सिंड्रोम हा एक रोगप्रतिकारक विकार आहे. त्यामुळे रुग्णामध्ये एलर्जीची तीव्र पातळी असते. त्याची लक्षणे संपूर्ण शरीरात दिसतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोप्या भाषेत समजून घेतल्यास, रुग्णांमध्ये उपस्थित असलेल्या मास्ट पेशी चुकून असे रसायन सोडतात, ज्यामुळे ऍलर्जीसह पोट, हृदय, श्वास आणि मेंदूवर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीच्या भावनांमध्ये जितका जास्त बदल होतो तितकी ही लक्षणे तीव्र होतात.

जिम्नॅस्ट नताशा 500 वेळा रूग्णालयात दाखल

नताशा व्यवसायाने जिम्नॅस्ट आहे. NY पोस्टच्या रिपोर्टनुसार, नताशाचे रडणे किंवा हसणे तिचा जीवही घेऊ शकते. यामुळे तिला जवळपास 500 वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 वर्षीय नताशा म्हणते, मला कोणत्याही प्रकारच्या भावनांची अॅलर्जी आहे. हसताना, रडताना, दुःखी असताना किंवा तणावाखाली असताना शरीरात अशी रासायनिक क्रिया होते, ज्यामुळे अॅलर्जीसारखी लक्षणे दिसू लागतात. शरीरावर रॅशेस दिसू लागतात. ती म्हणते, स्वत:ला जिवंत ठेवणेही तिच्यासाठी मोठे काम आहे. वयाच्या 20 व्या वर्षी आजारपणामुळे ती इतकी अस्वस्थ झाली होती की, तिने स्वतःच्या अंत्यसंस्काराची योजनाही आखली होती. केवळ हसणे आणि ताणतणावानेच नाही तर परफ्यूम आणि साफसफाईची कॉस्मेटिक उत्पादनांची देखील तिला ऍलर्जी आहे.

तज्ञांचे मत काय आहे?

नताशाचा हा दुर्मिळ आजार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. रुग्णाची प्रकृती बिघडली की त्याला विविध प्रकारचे लाईट्स देऊन आराम दिला जातो. उदाहरणार्थ, पोटात आणि शरीराच्या इतर भागात दुखण्याशी संबंधित औषधेही आणि काही लाईट्स ट्रिटमेंट देऊन ऍलर्जी नियंत्रणात आणली जाते. नताशा म्हणते, मी रोज स्वत:ला वाचवण्याची लढाई लढत आहे. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवते. मी उघडपणे हसू शकत नाही आणि उघडपणे रडूही शकत नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.