न्यूमोनिया झाल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवलंय! अशा वेळी आयुर्वेदिक उपचार पद्धती गुणकारी ठरते?

कोरोना झाल्यावर अनेकदा रुग्णाला न्युमोमिया होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते अशा वेळी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते व्हेंटिलेटरवर ठेवल्या नंतर आयुर्वेदिक उपचार पद्धती कशा पद्धतीने गुणकारी ठरते हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे.

न्यूमोनिया झाल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवलंय! अशा वेळी आयुर्वेदिक उपचार पद्धती गुणकारी ठरते?
न्यूमोनियावरील आयुर्वेदिक उपचारांबाबत जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 11:36 PM

न्यूमोनियावर (pneumonia) आयुर्वेदिक उपचार नेमके कोणते आहेत याबद्दल आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य डॉ. आबासाहेब रणदिवे यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. डॉ. आबासाहेब रणदिवे गेल्या 12 वर्षापासून आयुर्वेदिक उपचार रुग्णावर करत आहेत. न्यूमोनिया झाल्यावर अनेकदा व्हेंटिलेटर (Ventilator) लावला म्हणजे अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. रुग्णांचे नातेवाईक चिंता करतात आणि आपला रुग्ण वाचेल की नाही याबाबत शंका सुद्धा मनामध्ये धरतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर जरी लावले असेल तरी आयुर्वेदिक इमर्जन्सी ट्रीटमेंटच्या माध्यमातून बरे करता येऊ शकते. कोरोना आणि न्यूमोनिया व व्हेंटिलेटर निगडित आयुर्वेदीक उपचार (Ayurvedic Treatment) पद्धती याबद्दलची महत्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग टीव्ही 9 मराठी शी बातचीत करताना डॉक्टरांनी दिलेल्या माहितीबद्दल जाणून घेऊया.

1) व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णालाही आयुर्वेदिक औषधाचा फरक जाणवतो?

एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटर लावल्यावर त्याची तब्येत हळूहळू खालावत जाते. अनेकदा रुग्णाची ऑक्सिजन लेवल 15 ते 18 दरम्यान गेल्यावर त्याला कृत्रिम ऑक्सिजन लावावा लागतो आणि अनेकदा लोकांच्या मनामध्ये अशी भीती असते की रुग्णाला वेंटिलेटर लावला म्हणजे याचा अर्थ भविष्यात त्याचा मृत्यू होणार आहे परंतु असे अनेकदा घडत नसते. जेव्हा रुग्ण शेवटच्या घटका मोजत असतो अशा रुग्णांना सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रातील औषधांनी फरक जाणवलेला आहे आणि त्यांची तब्येत नॉर्मल लेव्हल वर आलेली आहे.

परंतु आयुर्वेदिक शास्त्राबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण असल्याने आणि योग्य ती जागरूकता नसल्यामुळे लोकांच्या मनात औषधांबद्दल अनेकदा नकारात्मक विचार येऊ लागतात आणि परिणामी लोक आयुर्वेदिक उपचारांकडे दुर्लक्ष करतात. रुग्णाला कोविड ची लक्षणे जाणवतात अशा वेळी आधुनिक उपचार पद्धती करत असताना आयुर्वेदिक शास्त्रातील औषधांची सुद्धा उपयोग करायला हवा यामुळे लक्षणे वाढणार नाही आणि परिणामी रुग्णाला लवकरच बरे वाटू लागेल.

2) आयुर्वेदिक औषध उपचार करत असताना नेमके कोणकोणते पथ्यं पाळायला पाहिजेत?

ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे जाणवलेली आहेत अशा व्यक्तींना कफ जास्त प्रमाणात होतो. परिणामी खोकला वाढतो, अशावेळी शरीरामध्ये खोकला निर्माण होईल अशा प्रकारचे पदार्थ आपण सेवन करायला नाही पाहिजे. रुग्णांनी आपल्या आहारामध्ये मूग डाळ व डाळीचे सूप तसेच भाजी भाकर अशा पद्धतीचा आहार स्वीकारला पाहिजे. कमी प्रमाणात जेवल्याने आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते अन्यथा ऍसिडिटी अपचन यासारख्या समस्या त्रास देतात. दुधाचे सेवन पूर्णपणे बंद करायचे. दुधामुळे शरीरात कफ निर्माण होतो आणि न्युमोनिया मध्ये ऑक्सिजनची मात्रा सुद्धा कमी होत नाही.

दुधाच्या सेवनाने शरीरातील न्यूमोनिया वाढतो. रुग्णाला फळांचा रस अजिबात सेवन करायला देऊ नये. बहुतेक फळ ही शीत प्रवृतीचे असल्याने रुग्णाच्या शरीरातील कफ वाढतो म्हणून जे फळ शीत प्रवृत्तीचे नाहीत उदाहरणार्थ डाळिंबाचा रस सेवन केल्याने रुग्णाच्या शरीरातील कफ कमी होतो अशा प्रकारच्या फळांचा रस रुग्णाला आवश्य द्यायला हवा. नॉनव्हेज पदार्थ सुद्धा रुग्णाला खायला देऊ नये कारण की हे पदार्थ पचायला जड असल्याने रुग्णाला समस्या होऊ शकते अशा वेळी आपण लग्नाला सेवन करण्यासाठी नॉनव्हेज सूप देऊ शकतो.

पाहा व्हिडीओ –

टिप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

न्यूमोनियावर आयुर्वेदिक उपचार खरंच शक्य आहेत? हो! इतके की ऑक्सिजन लेव्हलही नॉर्मल होईल

Bone Cancer : हाडांच्या कर्करोगापूर्वी मिळतात पाच संकेत, चुकूनही दुर्लक्ष करु नका…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.