Health | ज्येष्ठ नागरिक दिवस, नेत्रपटलाच्या आजारांसह जगणा-या ज्येष्ठांसाठी 5 उपयुक्त आणि महत्वाच्या सूचना…

आपल्या डोळ्यांच्या तपासणीसाठी दृष्टीमितिज्ञ अर्थात ऑप्टोमेट्रिस्ट किंवा नेत्रविकारतज्ज्ञ अर्थात ऑप्थॅल्मोलॉजिस्ट यांना नियमितपणे भेट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समस्येचे निदान लवकर झाले तर तुमच्या डोळ्यांना संरक्षण तर मिळेलच पण दृष्टी गमावण्याचा धोका टाळण्यासही मदत होईल.

Health | ज्येष्ठ नागरिक दिवस, नेत्रपटलाच्या आजारांसह जगणा-या ज्येष्ठांसाठी 5 उपयुक्त आणि महत्वाच्या सूचना...
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 6:00 AM

मुंबई : वयोवृद्ध व्यक्तींमध्ये नजर अधू होण्याची समस्या सर्रास आढळून येते. जगभरात 25 कोटी लोक दृष्टीदोषाचा (Visual impairment) सामना करत असून त्यापैकी 80 टक्‍के लोक 50 वर्षांपुढील वयोगटातील आहेत. दृष्टी गमावण्याचा वयोवृद्ध व्यक्तींच्या जीवनमानाच्या दर्जावर विपरित परिणाम होतो व त्यातून मृत्यू संभवू शकतो. नेत्रपटलांच्या आजारांविषयी अर्थात रेटिनल डिझिजेसविषयी जागरुकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने आणि उपचारांच्या अभावामुळे नेत्रपटलाचे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना नैराश्य आणि चिंता अशा मनोविकारांचा धोका (Danger) अधिक प्रमाणात असतो. रेटिनाच्या आजारांमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर त्यामुळे एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचे आयुष्य कायमचे आणि संपूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच नजर गमावण्याचा धोका टाळण्यासाठी रेटिनाची योग्य देखभाल करणे आणि रेटिनाचे आरोग्य (Health) जपणे या गोष्टींकडे पहिल्यांदा लक्ष दिले पाहिजे.

वाढत्या वयानुसार उद्भवणाच्या डोळ्यांच्या सर्वसाधारण समस्या

पुण्यातील इनसाइट व्हिजन फाउंडेशनचे मेडिकल डिरेक्टर डॉ. नीतिन प्रभुदेसाई सांगतात, “10 ते 15 टक्‍के ज्येष्ठ नागरिकांमध्ये रेटिनाशी निगडित समस्या उद्भवतात. मात्र त्यांची तीव्रता वेगवेगळी असते. यामध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, डायबेटिक मॅक्युरल एडेमा, व्हॅस्क्युलर ऑक्लुजन्स, रेटिनल डिटॅचमेंट या समस्या सरसकट आढळून येतात. म्हणूनच आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होण्यासाठी व तो बळावू नये यासाठी वर्षातून एकदा डोळे आणि रेटिनाची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेणा-या व्यक्तींनीही त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. त्यांच्या दृष्टीमध्ये काही बदल आढळून आल्यास ताबडतोब नेत्रविकारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

वाढत्या वयामध्ये नजर चांगली राखण्याचे काही उपाय

नेत्रतपासणी टाळू नका

आपल्या डोळ्यांच्या तपासणीसाठी दृष्टीमितिज्ञ अर्थात ऑप्टोमेट्रिस्ट किंवा नेत्रविकारतज्ज्ञ अर्थात ऑप्थॅल्मोलॉजिस्ट यांना नियमितपणे भेट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समस्येचे निदान लवकर झाले तर तुमच्या डोळ्यांना संरक्षण तर मिळेलच पण दृष्टी गमावण्याचा धोका टाळण्यासही मदत होईल. खरेतर कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा न घालणा-या, नजर चांगली असलेल्या ज्येष्ठांनीही नियमितपणे नेत्रतपासणी करून घ्यायला हवी. यामुळे संसर्गास प्रतिबंध होऊ शकेल तसेच कालपरत्वे बळावत जाणा-या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होऊ शकेल.

सांगितलेल्या उपचारांचे काटेकोर पालन करा

डोळ्यांचा कोरडेपणा, अश्रूपिंडांमध्ये अडथळा निर्माण होणे किंवा एएमडी आणि डीएमई सारखे कालपरत्वे बळावणारे आजार यापैकी कोणत्या समस्येवरील उपचारांची तुम्हाला गरज आहे हे विशेषज्ज्ञ ठरवतात. एएमडीच्या समस्येवर औषधांच्या व लेझर थेरपीच्या मदतीने प्रभावी उपचार शक्य आहेत आणि रुग्णांना दैनंदिन वापरासाठी कमी लो व्हिजन एड्स अर्थात अधू नजरेला आधार देणा-या उपकरणांचा वापरही करता येईल.

रक्तदाब, ग्लुकोजची पातळी आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा

आपला रक्तदाब, ग्लुकोजची पातळी आणि कॉलेस्ट्रॉल यांच्यावर नियमितपणे देखरेख ठेवा वरकरणी रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल या फक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित समस्या वाटतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यातून तुमच्या डोळ्यांसह इतर महत्त्वाच्या इंद्रियांची हानी होऊ शकते. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मधुमेह हा मूकपणे रेटिनाची हानी घडवून आणत असतो. असे असले तरीही आज रक्तातील ग्लुकोजची पातळी सातत्याने तपासण्यासाठी सेन्सर यंत्रणा बसविलेली कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरींग उपकरणे उपलब्ध आहेत. या उपकरणांमुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखता येऊ शकते. आपला रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल आणि ग्लुकोज निरोगी पातळीवर राखल्यास रेटिनाच्या आरोग्याचीही हमी मिळेल.

डोळ्यांना सतत जपा

तुम्हाला फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणजे प्रकाशाचा त्रास होण्याची समस्या नसली तरीही आपले डोळे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (यूव्‍ही) किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी उघड्या डोळ्यांनी सूर्यप्रकाशाकडे पाहणे टाळायला हवे. यूव्‍ही किरणांमुळे रेटिनाची हानी होते आणि बहुतांश लोकांना खूप उशीर होईपर्यंत ही गोष्ट लक्षात येत नाही. तेव्हा घराबाहेर यूव्‍ही प्रतिबंधक कोटिंग असलेले सनग्लासेस वापरा किंवा तुम्ही आधीच रेटिना किंवा डोळ्यांवरील उपचार घेत असाल तर तुमच्या विशेषज्ज्ञांनी सांगितलेला चष्मा वापरा.

अधिक आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करा

तुम्हाला रेटिनाशी निगडित काही विशिष्ट आजारांची लागण आधीच झाली असेल तर तुम्ही धूम्रपान आवर्जून टाळले पाहिजे. धूम्रपानामुळे नेत्रविकार जडतात तसेच अधिक वेगाने दृष्टीहीनता येते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.