Health: एकटेपणामुळे तणावच नव्हे तर कर्करोग होण्याचाही धोका; होऊ शकतात ‘हे’ आजार!

कोरोनाच्या काळात आपणा सर्वांनाच रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व समजले आहे. ती कमी झाल्यास जीव जाण्याचा धोकाही असतो. जे लोक एकटपेणाचा त्रास सहन करतात, त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही झपाट्याने कमी होऊ लागते.

Health: एकटेपणामुळे तणावच नव्हे तर कर्करोग होण्याचाही धोका; होऊ शकतात 'हे' आजार!
एकटेपणामुळे तणावच नव्हे तर कर्करोग होण्याचाही धोका
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 4:46 PM

आपले मित्र किंवा प्रिय माणसं आपल्या जवळ नसतील तर एकटेपणाचा (Loneliness) सामना करावा लागतो. अशावेळी केवळ मानसिक आरोग्यच (Mental Health) बिघडत नाही तर आरोग्याच्या अनेक समस्यांचा (Health Problems) सामना करावा लागतो. एकटेपणाच्या जाळ्यात अडकलेली लोकं ट्रेस किंवा डिप्रेशनशिवाय (Stress or Depression) अनेक आजारांना बळी पडू शकतात. एकटेपणा सहन करावा लागणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी होऊ लागते. एवढेच नव्हे तर असे लोक कर्करोगाचे रुग्णही होऊ शकतात. प्रेमात मिळालेला धोका, करिअरमधील अपयश किंवा इतर काही समस्या या एकटेपणाचे कारण ठरू शकतात. मात्र त्यापासून वेळीच सुटका न झाल्यास, गंभीर परिणाम होऊन समस्या आणखी वाढू शकतात. एकटेपणामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन याव्यतिरिक्त इतर कोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो ते पाहुया.

रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

कोरोनाच्या काळात आपणा सर्वांनाच रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व समजले आहे. ती कमी झाल्यास जीव जाण्याचा धोकाही असतो. जे लोक एकटपेणाचा त्रास सहन करतात, त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही झपाट्याने कमी होऊ लागते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने ताप, सर्दी, खोकला अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

कॅन्सरचा किंवा वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोका

एकटेपणा हा कोणाच्याही जीवावर बेतू शकतो. खरंतर, डिप्रेशन किंवा स्ट्रेस असताना लोकं अमली पदार्थ किंवा मद्यपान, धूम्रपान हे अधिक प्रमाणात करतात. मात्र ही सवय म्हणजे एखादी चूक नव्हे तर गुन्हा असतो. या घातक सवयींमुळे आपले शरीर झपाट्याने पोखरून निघते. त्यामुळे रुग्णांच्या अशा सवयींमुळे त्यांना कर्करोग होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, अशा घातक सवयींमुळे त्या व्यक्तीचा वेळेपूर्वीच मृत्यू होण्याची शक्यता अधिक वाढते.

हे सुद्धा वाचा

मधुमेह

ज्यांना जास्त स्ट्रेस घ्यायची सवय असते अशा लोकांना मधुमेह होण्याचा म्हणजेच त्यांची ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. जगापासून स्वत:ला दूर ठेवणारे लोक जास्त ताण घेतात. त्यांना कमी वयातच मधुमेह होतो. तसेच अशा रुग्णांना हाय ब्लड प्रेशरचाही त्रास होऊ शकतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.