Lychee Benefits And Side Effects : गरोदर महिलांनी ‘लिची’चे सेवन जपून करावे, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे !
गर्भवती महिलांनी निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. विविध फळे आणि भाज्यांचा पौष्टिक आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरही या काळात महिलांना देतात. परंतु, या काळात काही फळे खाण्यापूर्वी त्याचे फायदे तोटे जाणून घेणे गरजेचे असते.
गर्भवती स्रीयांना शरीरातील पौष्टिकतेची गरज पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ ताजी फळे (Fresh fruits) आणि विविध प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद, केळी, पेरू यांसारखी अनेक फळे आहेत, ती खायला गोड आणि चविष्ट तर आहेतच पण आरोग्यदायीही आहेत. जीवनसत्त्वे, खनिजे याशिवाय लोहासह अनेक पौष्टिक घटक (Nutrients) फळांमध्ये आढळतात. परंतु, या काळात काही फळे खाण्यापूर्वी त्याचे फायदे तोटे जाणून घेणे गरजेचे असते. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यापासून ते पोट साफ करण्यापर्यंत, मधुमेहापासून हृदय आणि किडनीच्या समस्यांपर्यंत. या पौष्टिक फळांच्या श्रेणीत लीचीचाही समावेश होतो.
लिची खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, लिची खाण्याचे अनेक तोटे आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लिचीचे सेवन करत असाल तेव्हा, काही गोष्टी लक्षात ठेवा. लिची खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
लिची खाण्याचे फायदे
निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रतिबंधित
उन्हाळ्यात लिचीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. लिची डिहायड्रेशन प्रतिबंधित करते. लिचीचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करू शकता. लिचीमध्ये चांगले पाणी असते, त्यामुळे लिचीचे सेवन केल्याने फायदा होतो.
प्रतिकारशक्ती
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील लिचीचे सेवन फायदेशीर ठरते. लिचीमध्ये व्हिटॅमिन-सी आढळते. याशिवाय बीटा कॅरोटीन, नियासिन, रिबोफ्लेविन आणि फोलेटच्या प्रमाणामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
पचनाची समस्या
पचनाच्या समस्या असतील तरीही लिचीचे सेवन करणे फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी लिचीचे सेवन केले जाऊ शकते. लिचीमध्ये फायबर असते जे पचन सुधारते. उन्हाळ्यात उलटी, जुलाबाची समस्या टाळण्यासाठी लिचीचे सेवन करावे.
लिची खाण्याचे तोटे
लिचीचे जास्त सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. जर गर्भवती महिलांनी संतुलित प्रमाणात-लिची खाल्ली नाही तर पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
– उन्हाळ्यात लिचीचे सेवन करणे फायदेशीर आहे पण त्यामुळे शरीरात गरमीचे परिणाम होतात. – लिची जास्त खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. – लिचीच्या अर्काचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. – मधुमेहाच्या रुग्णांनी लिचीचे सेवन करताना रक्तातील साखरेचे सतत निरीक्षण करावे.