कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे निंयत्रणात, मास्कमुक्तीचा निर्णय नाहीच : राजेश टोपे
राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाची (Corona) तिसरी लाट आटोक्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
जालना : राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाची (Corona) तिसरी लाट आटोक्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्यातील रुग्ण संख्या कमी झाल्याने तिसरी लाट (Corona Third Wave) येणार येण्याची शक्यता कमी असल्याचं राजेश टोपे म्हणाले. आता राज्यातील नागरिकांनी काळजी आणि चिंता करू नये, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता मास्क वापरायलाच हवा, असं त्यांनी सांगितलं. राज्यात मास्कमुक्तीबाबत सध्या निर्णय झालेला नाही. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला मास्क वापरावाचं लागणार आहे. राजेश टोपे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं म्हटलं. कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यानं चिंता करण्याची गरज नाही, मात्र मास्क वापरावाचं लागेल, असंही त्यांनी सांगितलंय.
मुंबई, पुणे नागपूर आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येची स्थिती नियंत्रणात आली आहे. यामुळं तिसरी लाट आता कमजोर झाली असं म्हणता येईल. कोरोना रुग्णसंख्या सध्या पूर्ण नियंत्रणात आहे. त्यामुळं चिंता करण्याची गरज नसल्याचं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात 10 टक्केपेक्षा कमी सक्रिय रुग्ण
राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाशी संबंधित चर्चा केली. राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना संक्रमण नियंत्रणात आलं आहे. यामुळं सध्या चिंता करण्याची गरज नाही. सध्या राज्यात पहिल्या स्थितीच्या तुलनेत 10 टक्के पेक्षा कमी रुग्ण आहेत, असं टोपे म्हणाले.
राज्यातील मास्कमुक्तीसंदर्भात विचारलं असता राजेश टोपे यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलं. आपण बेफिकीरी दाखवली असता कोरोना पुन्हा पसरू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं मास्कमुक्ती बाबत सध्या निर्णय होणार नसल्याचं म्हटलं. कोरोनापासून पूर्णपणे मुक्तता झालीय, अशा गैरसमजात राहू नका, असं ते म्हणाले.
शनिवारी राज्यात 893 रुग्ण
महाराष्ट्रात शनिवारी 893 कोरोना केसेस समोर आल्या आहेत. शनिवारी राज्यात सर्वाधिक सर्वाधिक केसेस पुणे शहरात आढळल्या होत्या. पुणे शहरात 174, पुणे ग्रामीणमध्ये 77 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 66 रुग्ण आढळले आहेत. तर, मुंबईत 89 रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत 21 नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये 39 तर, अहमदगरमध्ये 64 आणि बुलडाणा जिल्ह्यात 42 रुग्ण आढळले आहेत.
इतर बातम्या:
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा
काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी