Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mask Vs Respirator : संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी मास्क चांगला आहे की रेस्पिरेटर जाणून घ्या आत्ताच !!

Mask Vs Respirator: ऑस्ट्रिया (Austria) ने फेस मास्कच्या ऐवजी रेस्‍प‍िरेटर (Respirator) लावण्यासाठी सर्वांना सक्ती केलेली आहे. म्हणजेच येथे एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जातो तर त्याला रेस्‍प‍िरेटर लावणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे नेमका प्रश्न निर्माण होतो की, संक्रमणापासून जर आपल्याला संरक्षण मिळवायचे असेल तर अशावेळी रेस्पिरेटर फेस मास्कपेक्षा उत्तम आहे का? जाणून घेवूया प्रश्नाचे उत्तर...

Mask Vs Respirator : संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी मास्क चांगला आहे की रेस्पिरेटर जाणून घ्या आत्ताच !!
mask vs respirator
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:25 PM

दिल्लीः अमेरिका स्वास्थ एजन्सी CDC संक्रमणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्कऐवजी रेस्‍प‍िरेटरला प्राधान्य दिले आहे. जेव्हा महामारीची परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा सुरुवातीपासूनच मास्क वापरणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले होते परंतु दुसऱ्या लाटे नंतर ओमिक्रॉन (Omicron) च्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आणि पुन्हा येथे मास्क लावण्यासंदर्भात प्रत्येकाला सूचना देण्यात आल्या तसेच मास्क वापरणे सक्तीचे करण्यात सुद्धा आले. परंतु आता ऑस्ट्रेलियाने( Austria)फेस मास्क ऐवजी रेस्‍प‍िरेटर लावण्यास सक्तीचे केले आहे, म्हणजेच जर एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जात आहे तेव्हा त्याला मास्क ऐवजी रेस्पिरेटर लावणे गरजेचे आहे. रेस्पिरेटर सुद्धा मास्क प्रमाणेच उपयोगी आहे परंतु हे रेस्पिरेटर (Respirator) जास्त परिणामकारक व प्रभावी ठरत आहे. या रेस्पिरेटरची रचना अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती श्वास घेतो तेव्हा श्वास घेत असताना बाहेरचे काही किटाणू विषाणू आहेत त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही अशा प्रकारे या रेस्पिरेटरची रचना करण्यात आली आहे.

अशातच प्रश्न निर्माण होतो की संक्रमणापासून जर स्वतःला वाचवायचे असेल तर रेस्पिरेटर हे फेस मास्कपेक्षा परिणामकारक आहे, हे किती असरदार आहे? आरोग्य यंत्रणा याबद्दल नेमके व काय सांगते जाणून घ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे..

मास्‍क विरुद्ध रेस्‍पि‍रेटर: कोण आहे श्रेष्ठ

रेस्पिरेटर मास्कच्या तुलनेत किती परिणामकारक आहे हे समजून घेण्यासाठी हेल्थ वर्कर्स म्हणजेच आरोग्य कर्मचारी यांच्यावर काही संशोधन करण्यात आले. संशोधनानुसार काही गोष्टी समोर आल्या की, संक्रमण थांबवण्यासाठी मास्कच्या तुलनेत रेस्पिरेटर जास्त प्रभावी ठरले.

संशोधनानुसार जर रेस्पिरेटर वापरल्यानंतर एखादा व्यक्ती संक्रमित झालेल्या रुग्णांच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा ती व्यक्ती 25 तासापर्यंत त्या वायरस पासून सुरक्षित राहते तसेच जर एखादी व्यक्ती संक्रमित झालेल्या रुग्णाचे आणि सामान्य व्यक्तीने कपड्याचा मास्क घातला असेल तर एकाच जागेवर पुढील अर्ध्या तासामध्ये त्या व्यक्तीला संक्रमणाचा धोका होऊ शकतो.

आरोग्य यंत्रणाचे नेमके काय आहे म्हणणे?

अमेरिकेच्या आरोग्य एजन्सी सेंटर डिजीज कंट्रोल एंड  प्र‍िवेंशन (CDC) यांनी सुद्धा मान्य केले आहे की कोविड-19 पासून संरक्षण करण्यासाठी फेस मास च्या तुलनेत रेस्पिरेटर जास्त परिणाम कारक असा पर्याय आहे. खरे तर या एजन्सीचे असे म्हणणे आहे की, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने रेस्पिरेटर कोणत्या दर्जाचे आहे यावरील पुढे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत तसेच आपण रेस्पिरेटर ना चांगल्या पद्धतीने जर चेहऱ्यावर लावले तर यापासून संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो.

सीडीसी यांच्या मते नेशनल इंस्‍टीट्यूट ऑफ ऑक्‍यूपेशनल सेफ्टी एंड रिसर्च (NIOSH) द्वारे अप्रूव्‍ड रेस्पिरेटरला उत्तम मानले जाते पण तुम्ही एखाद्या रुग्णाला भेटण्यास जात असेल तर या मासला जरूर वापरा याशिवाय ट्रेन येईल किंवा बसमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर अशा वेळी याचा अवश्य वापर करा किंवा कामाच्या ठिकाणी जेथे तुम्ही काम करत आहात तर त्याचवेळी याचा वापर करणं अनिवार्य आहे.

या महामारीच्या सुरुवातीच्या काळा दरम्यान असे मानले जात होते की, कोरोनाचा संक्रमान खोकला आणि शिंकल्याने पसरतो परंतु आता हे सपशेल फेल ठरले आहे आणि हा व्हायरसच्या माध्यमातूनसुद्धा पसरतो हे सिद्ध झाले आहे. श्वास घेते वेळी आणि श्वास सोडतानासुद्धा हा व्हायरस पसरतो तसेच अशा वेळी जेव्हा आपण श्‍वास सोडत असतो आणि एकमेकांशी बोलत असतो तेव्हा तोंडातून निघणारे ( Aerosols) जे कण असतात ते हवेमध्ये उपस्थित राहतात आणि संक्रमण पसरवतात. रेस्पिरेटर यांना थांबवतो तसेच सर्जिकल मास्क ड्रॉपलेटला थांबवतो परंतु कणाना थांबवू शकत नाही.

संबंधित बातम्या

इथल्या हवेत काहीतरी खास आहे… ‘यामुळे’ लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात…

औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये; मंत्री अब्दुल सत्तारांचं खा. इम्तियाज जलील यांना आव्हान!

Narvekar on Nitesh Rane : नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांचे खोचक ट्विट, झणझणीत वाक्याने भाजप कार्यकर्ते खवळले!

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.