Lifestyle : असं मागं मागं वळून काय बघता? गाण्याचं ठिकय पण कुणी शरीरावर नजरा खिळवत असेल तर समजा धोका ! वाचा नवा सर्वे
एखाद्याच्या चेहऱ्याऐवजी त्याच्या शरीराकडे बघणे हे वर्तन अत्यंत वाईट आहे. या संशोधनामध्ये 1,000 हून अधिक महिला आणि पुरूष सहभागी झाले होते. या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या विषमलैंगिक सहभागींना त्यांच्या स्वत: च्या शरीराच्या विरुद्ध लिंगाकडे पाहण्याच्या वर्तनाची स्वत: ची तक्रार करण्यास सांगितले गेले होते.
अनेकांना सवय (Habit) असते, कोणी कुठे जात असेल तर त्याच्याकडे एक टक लावून बघणे. इतकेच नव्हेतर एखादी सुंदर मुलगी रस्त्यांनी जात असेल तर अनेकजण तिच्याकडे बघत असतात. मात्र, नुकताच झालेल्या एका संशोधनातून (Research) एक धक्कादायक गोष्ट पुढे आली असून जर एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडे एक टक लावून सतत बघत असेल तर ते धोकादायक आहे. संशोधक डॉ रॉस हॉलेट यांच्या मार्गदर्शनाखाली एक संशोधन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संशोधनाचा निष्कर्ष अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल या जर्नलमध्ये प्रकाशित (Published) करण्यात आला आहे.
संशोधनामधून धक्कादायक सत्य पुढे…
एखाद्याच्या चेहऱ्याऐवजी त्याच्या शरीराकडे बघणे हे वर्तन अत्यंत वाईट आहे. या संशोधनामध्ये 1,000 हून अधिक महिला आणि पुरूष सहभागी झाले होते. या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या विषमलैंगिक सहभागींना त्यांच्या स्वत: च्या शरीराच्या विरुद्ध लिंगाकडे पाहण्याच्या वर्तनाची स्वत: ची तक्रार करण्यास सांगितले गेले होते. यामध्ये आढळले की, पुरुषांनी चेहऱ्याऐवजी अर्धवट आणि पूर्ण कपडे घातलेल्या महिलांच्या शरीराकडे अधिक टक लावून पाहणे पसंत केले. म्हणजेच पुरूष फार कमी प्रमाणात महिलांच्या चेहऱ्याकडे बघतात. पुरूषांची नजर ही महिलांच्या चेहऱ्यापेक्षाही त्यांच्या शरीरावर अधिक असते.
वाचा संशोधनामध्ये नेमके काय म्हटंले गेले आहे
संशोधनामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी कोणत्याही पुरुष किंवा महिलेच्या शरीराकडे अजिबात टक लावून बघितले नाही. म्हणजे महिला या पुरूषांच्या चेहऱ्याकडे किंवा त्यांच्या शरीराकडे एक टक लावून बघणे पसंत करत नाहीत. यावर डॉ होलेट म्हणाले की, महिलांनी पुरुषांच्या शरीराकडे टक लावून पाहण्यापेक्षा पुरुषांनी स्वतःहून महिलांच्या शरीराकडे टक लावून पाहण्याची अधिक शक्यता असते. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की सेल्फ रिपोर्ट आणि आय ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून टक लावून पाहण्याचे मोजमाप करताना वर्तनाचे समान नमुने दिसून येतात. जे असे सूचित करतात की भिन्नलिंगी लोकांना त्यांच्या टक लावून पाहण्याच्या सवयींबद्दल माहिती असते. यासंदर्भात aninews ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.महल