Microwave Harmful Effect: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यास होऊ शकतात गंभीर आजार

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करून खाण्याची अनेक लोकांना सवय असते. मात्र त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊन अनेक आजार होऊ शकतात.

Microwave Harmful Effect: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यास होऊ शकतात गंभीर आजार
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 4:54 PM

नवी दिल्ली – बऱ्याच लोकांना गरम गरम अन्न जेवण्याची सवय असते. विशेषत: थंडीच्या दिवसात लोकांना गरम अन्न खायला आवडते. मात्र वेळ आणि गॅस या दोहोंची बचत व्हावी या हेतूने आजकाल बरेच जण अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करू लागले आहेत. गेल्या काही काळापासून मायक्रोवेव्ह (microwave) हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल अन्न शिजवण्यापासून ते अन्न गरम (food) करण्यापर्यंत मायक्रोवेव्ह सहज वापर केला जातो. त्याशिवाय ऑफीसमध्ये बरेच जण दुपारी जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरतात. मात्र मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेले अन्न तुमच्यासाठी धोकादायक (harmful) ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्याचे तोटे जाणून घेऊया.

रोगप्रतिकारक शक्तीवर होतो वाईट परिणाम

हे सुद्धा वाचा

आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात अन्नाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत होतेच, त्याशिवाय आपल्याला ऊर्जाही मिळते. पण जेव्हा आपण मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले किंवा गरम केलेले अन्न खातो, तेव्हा त्याचा आपल्या प्रतिकारशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो. खरं तर, अन्नाच्या आत असलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या जीवाणूंचा मायक्रोवेव्हमुळे नाश होतो.

गर्भवती महिला आणि बाळासाठी हानिकारक

तसं पहायला गेलं तर मायक्रोवेव्हधील अन्न हे सर्वांसाठीच हानिकारक असतं. पण तुम्ही गरोदर असाल तर मायक्रोवेव्हमधील अन्न बिलकूल खाऊ नका. मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवाताना किंवा ते गरम करताना त्यातील (मायक्रोवेव्हमधील) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा अन्नावर परिणाम होतो. त्यामुळे हे खाल्यास गरोदर महिला व तिच्या बाळाचेही नुकसान होऊ शकतो. गर्भपाताची शक्यताही वाढते.

लवकर येते वृद्धत्व

मायक्रोवेव्हमधील खाद्यपदार्थ अगदी लवकर शिजतात. मायक्रोवेव्हमध्ये असलेल्या किरणांचा अन्नपदार्थांवर मोठा प्रभाव पडतो, ज्याचा आपल्या त्वचेवर घातक परिणाम होतो आणि वेळेपूर्वीच सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे शरीरावर लवकर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात.

अन्न खराब होते

एकदा अन्नपदार्थ तयार केल्यानंतर तो वारंवार गरम केल्यास त्यातील पोषणमूल्य नष्ट होते. मात्र मायक्रोवेव्हच्या बाबतीत हे आणखनीच हानिकारक आहे. वास्तविक, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नाचे पोषणमूल्य दुप्पट वेगाने कमी होते. अशा परिस्थितीत विघटनापासून (अन्नाचे) संरक्षण करणारे घटक नष्ट होतात, ज्यामुळे अन्न खराब होऊ लागते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.