Covid 19 : कोरोनानंतर मायग्रेनचा त्रास खरंच वाढला आहे का? पाहा संशोधक काय म्हणताय
कोरोनामुळे अनेकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. जगभरात कोरोनाने थैमान घातले. कोरोनाची लस घेतल्यानंतर ही कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला. आता काही लोकांनी असा दावा केला की कोरोनामुळे मायग्रेनचा त्रास वाढला आहे. यावर डॉक्टरांचे मत काय आहे.
मुंबई : कोरोना होऊन गेलेल्या लोकांमध्ये अजूनही वेगवेगळे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहे. त्याचे दुष्परिणाम आता हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. काही लोकं असा दावा करत आहेत की, कोरोनानंतर त्यांना मायग्रेनचा त्रास होत आहे. डोकेदुखी वाढली आहे. कोरोना आणि त्याच्या लसीचा मायग्रेनवर खरोखरच परिणाम झाला आहे का हा प्रश्न चर्चेत आला आहे.
स्पॅनिश हेडेक क्लिनिकमध्ये, मायग्रेनच्या रुग्णांनी अशी माहिती दिली की कोरोना झाल्यानंतर किंवा लस घेतल्यानंतर त्यांची मायग्रेनची स्थिती अधिक बिघडत आहे. क्लिनिकच्या 550 प्रौढ रूग्णांपैकी, 44.9 टक्के (247) किमान एकदा COVID-19 झाल्याची नोंद झाली आणि 83.3 टक्के (458) लसीकरण करण्यात आले. 61 रुग्णांनी (24.7 टक्के) नोंदवले की कोविड-19 पासून मायग्रेनची स्थिती बिघडली आहे आणि 52 (11.4 टक्के) यांनी नोंदवले आहे की लसीकरणानंतर मायग्रेनची स्थिती अधिकच बिघडली आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे ते 2.5 पट जास्त आहेत.
कोरोना आणि मायग्रेनचा काही संबंध नाही
रुग्णांच्या दाव्यांबाबत, रुग्णांच्या ई-डायरीमधील माहितीची तपासणी केली. कोरोनाची लागण झाल्यानंतर किंवा लस घेतल्याच्या एक महिन्यापूर्वी आणि नंतरच्या डोकेदुखीच्या पॅटर्नमध्ये कोणताही विशेष फरक दिसून आला नाही. एवढेच नाही तर मायग्रेनची तक्रार करणाऱ्यांचा पॅटर्नही पूर्वीसारखाच होता. त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की कोविड आणि त्याच्या लसीचा मायग्रेनच्या तीव्रतेवर कोणताही परिणाम होत नाही. हा अभ्यास युरोपियन जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.
डॉक्टरांनी मायग्रेनच्या रुग्णांची चिंता दूर करावी
अभ्यासकांनी म्हटले की, ‘COVID-19 च्या बाबतीत, आम्ही यापूर्वी नोंदवले होते की डोकेदुखी हे खरं तर संसर्गाचे एक सतत आणि त्रासदायक लक्षण आहे. तरीही हे मायग्रेनच्या वाढीशी जोडलेले नाही. आमचा विश्वास आहे की डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांच्या शंका दूर केल्या पाहिजेत आणि त्यांना सांगावे की कोविड किंवा लसीमुळे त्यांचा मायग्रेन वाढलेला नाही.’