तुम्हाला सातत्याने मायग्रेनचा त्रास सतावतोय? ‘हे’ करा, तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ 3 टिप्स करतील काम
मायग्रेन म्हणजे प्रचंड डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. ज्यामुळे डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं. मायग्रेनच्या स्थितीत डोक्याच्या विशिष्ट भागात वेदना होतात. अशावेळी जर तुम्हाला डोक्यात वारंवार तीव्र वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
अनेकवेळा ऑफीसमध्ये कामाचा मोठा ताण असतो त्यामुळे आपण सतत काम करत राहतो आणि आपला ताण वाढत जातो. अश्याने आपल्या डोक्यात तीव्र वेदना जाणवू लागते. डोकेदुखी ही एक सामान्य समस्या मानली जाते, परंतु कधीकधी हे मायग्रेनची लक्षण सुद्धा असू शकतात. मायग्रेनच्या स्थितीत डोक्याच्या विशिष्ट भागात वेदना होतात. अशावेळी जर तुम्हाला डोक्यात वारंवार तीव्र वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मायग्रेन म्हणजे प्रचंड डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. ज्यामुळे डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या मते, मायग्रेनची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे उलट्या किंवा चक्कर येणे. जेव्हा मायग्रेन होतो तेव्हा व्यक्ती कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नाही. डायटीशियन रमिता कौर सांगतात की, कधीकधी शरीरातील हार्मोनल बदलदेखील मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतात. मायग्रेनच्या दुखण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करता येईल, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मायग्रेनच्या या समस्या पासून आराम मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन करावे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
त्रिफळाचे सेवन करा
त्रिफळ्यात आवळा, बिभिताकी आणि हिरडा या तीन गोष्टींचा समावेश होतो. ते खाल्ल्याने मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळतो. त्रिफळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. यासोबतच ते पचनसंस्था मजबूत करण्याचं ही काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत खाऊ शकता.
ब्राह्मी चहा
शरीराची उष्णता शांत करण्यासाठीही ब्राह्मी खूप फायदेशीर ठरते. तसेच पित्ताच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. तुमहाला जर मायग्रेनचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही रात्री ब्राह्मी चहा पिऊ शकता. याने मायग्रेनचा दुखण्यापासून आराम मिळतो.
नारळाचे पाणी
नारळ पाण्याच्या सेवनाने शरीरातील हार्मोनल बदल नियंत्रित करण्यास मदत करते. यासोबतच डिहायड्रेशनची समस्या ही कमी होते. आठवड्यातून किमान तीन वेळा नारळाचे पाणी प्यायल्यास मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो.