Monkeypox : कोरोना प्रमाणेच ‘मंकीपॉक्स’ वर लस आवश्यक आहे का? पुन्हा लसीकरण मोहीम राबवावी लागेल; काय म्हणतात तज्ज्ञ

मंकीपॉक्सची प्रकरणे जगभर वाढत आहेत. आतापर्यंत 18 हजार 800 लोक या विषाणूंच्या विळख्यात आले आहेत. WHO ने अलीकडेच या आजाराला जागतिक आरोग्याशी निगडित आणीबाणी घोषित केले आहे. भारतातही दिल्ली, यूपी, केरळ, झारखंडसह अनेक राज्यांनी या विषाणूबाबत सूचना जारी केल्या आहेत.

Monkeypox : कोरोना प्रमाणेच ‘मंकीपॉक्स’ वर लस आवश्यक आहे का? पुन्हा लसीकरण मोहीम राबवावी लागेल; काय म्हणतात तज्ज्ञ
मंकीपॉक्सImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 5:39 PM

मंकीपॉक्सची प्रकरणे जगात झपाट्याने वाढत आहेत. हा विषाणू 75 देशांमध्ये पसरला आहे. भारतातही दिल्ली, यूपी, केरळ, झारखंडसह अनेक राज्यांनी या विषाणूबाबत सूचना (Virus Notice) जारी केल्या आहेत. भारतातही याची चार प्रकरणे समोर आली आहेत. आता या वाढत्या केसेसमध्ये लोकांच्या मनात प्रश्न आहे की, कोरोना सारखी मंकीपॉक्सची लस दिली जाणार आहे का? आपल्याला पुन्हा एकदा दोन डोसच्या चक्रात अडकावे लागेल का? यावर अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर शासनाची भूमिका (Role of Govt) जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, मंकीपॉक्ससाठी आता कोणतीही लसीकरण मोहीम (Vaccination campaign) सुरू केली जाणार नाही. मंकीपॉक्सचा मृत्यूदर कमी आहे आणि तो फार वेगाने पसरत नाही. या कारणास्तव, सध्या लसीकरणापेक्षा खबरदारी घेण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.

चेचक (स्मॉल पॉक्स) लस खूप प्रभावी!

डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, मंकीपॉक्सच्या बाबतीत चेचक (स्मॉल पॉक्स) लस देखील वापरली जाऊ शकते. मंकीपॉक्सच्या बाबतीत स्मॉल पॉक्सच्या विरुद्ध सेकंड आणि थर्ड जनरेशन वॅक्सीन(लस) वापरल्या जाऊ शकतात असे ते म्हणतात. त्याचवेळी डॉ. ईश्वर गिलाडा यांनी मंकीपॉक्सच्या लागण संदर्भात संवाद साधताना सांगितले की, मंकीपॉक्सवर फक्त चेचक (स्मॉल पॉक्सची) लस प्रभावी ठरू शकते.

स्मॉल पॉक्सची लस घेतलेले, सुरक्षित!

डॉ. ईश्वर गिलाडा म्हणतात की, ज्या लोकांना स्मॉल पॉक्स विरुद्ध लसीकरण करण्यात आले होते त्यांना देखील मंकिपॉक्सपासून 85 टक्के संरक्षण मिळते. डॉ ईश्वर म्हणाले की, विज्ञानात हे सिद्ध झाले आहे की जे पॉक्स विषाणू असतात, ते एकमेकांच्या विरोधात संरक्षण देतात. या कारणास्तव, मंकिपॉक्सच्या विरुद्ध स्मॉलपॉक्स लस देखील वापरली जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेत आहे ‘स्मॉल पॉक्स’ लसीचे तंत्रज्ञान

डॉ. चंद्रकांत यांच्या मते, सध्या भारतात स्मॉल पॉक्ससाठी सेकंड आणि थर्ड जनरेशनच्या लस तयार करण्याची क्षमता नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारेच लसीची व्यवस्था केली जाऊ शकते. डॉ. ईश्वर म्हणाले की, MVA-BN आणि LC-16 सारख्या लसी मंकीपॉक्स विरुद्ध प्रभावी सिद्ध होऊ शकतात. परंतु, सध्या या लसींचे तंत्रज्ञान भारताकडे नाही. सध्या फक्त अमेरिकेत स्मॉल पॉक्सची लस उपलब्ध आहे. भारताला ती लस घ्यावी लागेल.

लसीकरण मोहिमेची गरज भासणार नाही

तज्ञ असेही गृहीत धरत आहेत की, मंकिपॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची आवश्यकता नाही. ज्या लोकांना एकतर या विषाणूची लागण झाली आहे किंवा ज्यांना त्याची लागण होऊ शकते त्यांना अधिक लसीची आवश्यकता आहे. या धोरणांतर्गत लसीकरण मोहीम राबवली गेली, तर त्याला रिंग लसीकरण म्हणतात. स्मॉल पॉक्स विरुद्ध लसीकरण त्याच प्रक्रियेअंतर्गत केले गेले आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.