Monkeypox Update | मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दोन नवी लक्षणं, ब्रिटनमधील संशोधन, अलर्ट रहावेच लागेल!

Symptoms of monkeypox : जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 18 हजारांपेक्षा पुढे पोहोचली आहे. ताप, डोकेदुखी, चेहरा आणि शरीरावर व्रण येणं ही या आजाराची सामान्य लक्षणं आहेत.

Monkeypox Update | मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दोन नवी लक्षणं, ब्रिटनमधील संशोधन, अलर्ट रहावेच लागेल!
मंकीपॉक्सImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 6:15 AM

मुंबईः कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट कमी होताच जगभरातील आरोग्य यंत्रणांना आता मंकीपॉक्समुळे (Monkeypox) धडकी भरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World health Organization) मते, आतापर्यंत 78 देशांतील 18000 पेक्षा जास्त नागरिकांना मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. WHO ने मंकीपक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास ताप, डोकेदुखी, शरीरावर व्रण येणे अशी सामान्य लक्षणे दिसून येत आहे. तसे तर हा विषाणू फार जुना आहे. मात्र गेल्या काही दिवसात या विषाणूग्रस्तांची संख्या अचानक वाढताना दिसून येत आहे. बहुतांश रुग्णांमध्ये वरील तीन प्रमुख लक्षणेच आढळली आहेत. पण एका नव्या संशोधनानुसार आणखी दोन लक्षणांची भर पडली आहे.

नवी लक्षणे कोणती?

ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सच्या 197 रुग्णांवर एक संशोधन करण्यात आलंय. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं असून या अहवालात नवी दोन लक्षणांचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील पहिलं म्हणजे रेक्टल (मल उत्सर्जन होणारा अवयव किंवा मलायश) मध्ये वेदना आणि दुसरे लक्षण म्हणजे पेनाइल एडिमा (लैंगिक अवयवात वेदनारहित सूज). हे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते, मंकीपॉक्सच्या संशयितांची तपासणी करताना या दोन लक्षणांवरही नजर ठेवावी लागेल. मंकीपॉक्सच्या लक्षणांच्या यादीत यांचाही समावेश आवश्यक आहे. याआधारे रुग्णांवर उपचारही झाले पाहिजेत. ही लक्षणे आढळल्यास संशयित मानून मंकीपॉक्सची चाचणीदेखील केली पाहिजे..

शरीरसंबंधांतून संसर्ग झाल्यास ही लक्षणे…

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्सचे 99% रुग्ण समलैंगिक पुरुष आहेत. जे पुरुष इतर पुरुषांशी संबंध ठेवतात, अशांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीरसंबंधांद्वारे पसरणाऱ्या मंकीपॉक्समध्ये ही दोन लक्षण आढळून येऊ शकतात. महामारी तज्ज्ञ डॉ. अंशुमन कुमार म्हणतात, मंकीपॉक्स पसरण्याची तीन कारणं आहेत. यात पहिले म्हणजे प्राण्याच्या संपर्कात येणे, दुसरे म्हणजे संक्रमित रुग्णाची त्वचा किंवा त्याच्या संबंधी वस्तूंच्या संपर्कात येणं आणि तिसरे कारण म्हणजे शरीरसंबंध. एखादा पुरुष मंकीपॉक्स संक्रमित असेल तर पुढील तीन ते पाच दिवसात त्याच्या शरीरावर मंकीपॉक्सचे व्रण येऊ शकतात. या दरम्यान, त्याने इतर पुरुषासोबत संबंध ठेवल्यास हा विषाणू आणखी पसरू शकतो.

एचआयव्हीएवढा घातक आहे?

डॉ. अंशुमन कुमार म्हणतात, मंकीपॉक्स हा आजार एचआयव्हीप्रमाणे सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार नाही. मात्र अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशात समलैंगिक पुरुषांची संख्या जास्त आहे. त्यांच्या एकापेक्षा जास्त पार्टनर आहेत. त्यामुळे मंकीपॉक्सचे रुग्ण तेथे जास्त आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.