Monsoon Care | पावसाळी हंगामात रोगप्रतिकारक शक्ती आणि पाचनतंत्र बळकट ठेवायचेय? मग, ‘हे’ 7 उपाय लक्षात ठेवा!

या हंगामात, अनेकदा पाचन प्रणाली विचलित होते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. अशा परिस्थितीत, गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखीसारख्या समस्यांबरोबरच, इतर आजारांना बळी पडण्याचा धोकाही लक्षणीय वाढतो.

Monsoon Care | पावसाळी हंगामात रोगप्रतिकारक शक्ती आणि पाचनतंत्र बळकट ठेवायचेय? मग, ‘हे’ 7 उपाय लक्षात ठेवा!
पाचन प्रणाली
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 7:06 AM

मुंबई : पावसाळ्याचा हंगाम हा आनंददायी वाटतो, परंतु तो आपल्याबरोबर बर्‍याच समस्या देखील आणतो. या हंगामात, अनेकदा पाचन प्रणाली विचलित होते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. अशा परिस्थितीत, गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखीसारख्या समस्यांबरोबरच, इतर आजारांना बळी पडण्याचा धोकाही लक्षणीय वाढतो. आपल्या पाचन तंत्राच्या दुरुस्तीसाठी, तसेच आपल्या रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी ठरेल, असे काही उपाय येथे जाणून घ्या (Monsoon Care use these tips to keep immune and digestion system healthy).

प्रभावी उपाय :

  1. तांबेच्या भांड्यात पाणी पिण्यामुळे चमत्कारिक परिणाम होतात. पोटाच्या सर्व समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर आहे. हे बर्‍याच संशोधनातही सिद्ध झाले आहे. म्हणून आतापासून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय लावून घ्या. परंतु, तांब्याची भांडी लाकडावर किंवा टेबलावर ठेवा.
  2. फायबर समृद्ध आहार पाचन तंत्राला बळकट करण्याचे काम करते. म्हणून, तंतुमय फळं, संपूर्ण धान्य, भाज्या, शेंगदाण्यांसारख्या फायबर समृद्ध घटकांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा.
  3. आजकाल उशिरा खाणे लोकांच्या सवयीचा एक भाग बनला आहे. उशिरा खाल्ल्यानंतर, लोक थेट झोपायला जातात. अशा परिस्थितीत अन्न पचनासाठी वेळ मिळत नाही आणि पाचन तंत्राला त्रास होतो. पावसाळ्यात पाचन तंत्र अधिक संवेदनशील असल्याने सामान्य दिवसांपेक्षा, या दिवसांत अधिक त्रास होण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून, दररोज वेळेवर खाण्याची सवय लावा. तसेच, प्रत्येक अन्न चावून खा.
  4. अन्न खाल्यानंतर किमान अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यावे, यामुळे पाचक प्रणालीला अन्न पचवण्यास मदत होते. यामुळे पाचन शक्ती मजबूत होते. दररोज सकाळी रिक्त पोटी आणि दोन्ही वेळा जेवल्यानंतर अर्धा तासाने कोमट पाणी प्या.
  5. जर पाचक प्रणाली निरोगी ठेवायची असेल, तर प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस उपवास केला पाहिजे. उपवासाच्या दिवशी फळं आणि रस इत्यादि सेवन करा. लांघनामुळे पाचक प्रणालीला विश्रांती मिळते आणि शरीराला स्वतःला रीसेट करण्यासाठी वेळ मिळतो.
  6. थंड गोष्टी पाचनशक्ती कमी करतात, म्हणून पावसाळ्यात थंड गोष्टी घेणे टाळा. जर तुम्हाला थंड पाणी प्यायचे असेल, तर मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणीच प्या.
  7. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चाला. सकाळी योग आणि प्राणायाम केल्यास पाचन तंत्र मजबूत होते. पाचन तंत्रासाठी त्रिकोणासन, पश्चीमोत्तानासन आणि पवनमुक्तासन अत्यंत फायदेशीर आहेत. सकाळी चालत असताना, वेगवान चालण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी सामान्य वेगाने चाला. जेवण झाल्यानंतरही शतपावली घाला.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Monsoon Care use these tips to keep immune and digestion system healthy)

हेही वाचा :

COVID-19 : ही असू शकतात मुलांमध्ये कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणे, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती

Skin Care : तुमची त्वचा सेन्सिटिव्ह आहे? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.