पावसाळ्यातील ताप…असू शकते गंभीर आजाराचे संकेत! नका करू दुर्लक्ष; तत्काळ घ्या डॉक्टरांकडून उपचार

Monsoon Diseases: या पावसाळ्यात अनेक प्रकारचे जिवाणू सक्रिय होतात. ज्यामुळे ताप येतो. त्यामुळे इतर अनेक घातक आजारही होऊ शकतात. या ऋतूमध्ये खूप ताप येतो, त्यामुळे सतर्क राहा, हे अनेक धोकादायक आजारांचे लक्षण असू शकते. जाणून घ्या, ताप कमी करण्यासाठी काही सोपे उपाय.

पावसाळ्यातील ताप...असू शकते गंभीर आजाराचे संकेत! नका करू दुर्लक्ष; तत्काळ घ्या डॉक्टरांकडून उपचार
पावसाळ्यातील ताप...असू शकते गंभीर आजाराचे संकेत!Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:45 PM

मुंबई : दिल्ली-मुंबईसह संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस म्हणजे जास्त आर्द्रता आणि पाणी साचणे. त्यामुळे तापाबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवतात. अशा हवामानात डेंग्यू व्यतिरिक्त चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉईड, खोकला, सर्दी, ताप, थकवा, सुस्ती, डोकेदुखी यांसारख्या समस्या सामान्य असतात. पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी (Decreased immunity) होते. त्यामुळे शरीरात असंतुलन निर्माण होते. या असंतुलनामुळे पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मेदांता-द मेडिसिटी हॉस्पिटलच्या आयुर्वेद आणि इंटिग्रेटिव्ह मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. जी. गीता. कृष्णन म्हणाल्या, “पावसाळ्यात, अधिक काळजी घेणे (Taking more care) गरजेचे असते. या दिवसात, आहार, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपण किती पाणी पितो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लोकांना पिण्याआधी पाणी उकळण्याचा सल्ला दिला जातो. दह्यासारखे आंबवलेले पदार्थ (Fermented foods) या ऋतूत टाळावेत. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे आतड्यांसंबंधी संक्रमण आणि त्वचेची ऍलर्जी देखील होऊ शकते.

तापावर आयुर्वेदिक उपचार

डॉ. कृष्णन म्हणाले की, पावसाळ्यात जास्त आर्द्रता(ह्यूमिडिटी) असल्याने ताप येणे सामान्य आहे. एक लिटर पाण्यात एक चमचा आलं पावडर (सुंठ) मिसळल्याने फायदा होऊ शकतो. “येथे, विशेष काळजी घ्या की, पाण्यात सुंठ जास्त नको, आणि हा काढा फक्त ताप आल्यावरच सेवन करावा. त्याच बरेाबर धणे उकळून तयार केलेल्या काढ्याचाही वापर हेावू शकतो. मात्र, तो ही नियमित नको. ज्या दिवशी हलका ताप असेल तेव्हाच हा उपाय करावा.

त्वचेशी संबंधित समस्या असल्यास

पावसाळ्यात त्वचेची ऍलर्जी आणि बुरशीची(फंगस) समस्या देखील सामान्य आहे. “त्वचेशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी कडूलिंबाच्या पानांची पेस्ट यावर खूप प्रभावी ठरते. ही पेस्ट वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. घसा दुखीसाठी अर्धा कप दुधात एक चमचा हळद टाकून प्यावे. चवीसाठी त्यात थोडेसे मध घालता येईल.

हे सुद्धा वाचा

जेवणात मीठ कमी वापरा

तीन वेळा मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी अनेक वेळा कमी प्रमाणात खा. तसेच “जेवणात जास्त मीठ घालणे टाळा, तसेच गोड खाणे टाळा.”

घसा दुखीच्या समस्येवर हा उपचार

राजधानीतील चौधरी ब्रह्म प्रकाश आयुर्वेद चरक संस्थेच्या डॉ. पूजा सभरवाल म्हणाल्या, “पावसाळ्यात लोकांना भेडसावणारी एक सामान्य समस्या म्हणजे घसा खवखवणे. त्यामुळे त्या व्यक्तीला गिळण्यास त्रास होतो. ते स्वतःच बरे होण्यासाठी सहसा एक आठवडा लागतो. अनेक आयुर्वेदिक उपायांमुळे ही समस्या लवकर दूर होण्यास मदत होऊ शकते. यासाठी 10 काळी मिरी, अर्धा इंच आले, 10 तुळशीची पाने नीट धुवून दोन ग्लास पाण्यात टाका, नंतर पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. थोडे थंड होऊ द्या. दिवसभर नियमित अंतराने हा काढा प्यावा. आपण मुलेठी देखील चघळू शकता.

आयुर्वेदिक उपचारांना द्यावे प्राधान्य

डॉ. सभरवाल म्हणाले की, माणसाची प्रतिकारशक्ती कमी झाली की, त्याला आजार होण्याची भीती असते. ते म्हणाले, “आयुर्वेद आपल्या रुग्णांवर कसा उपचार करतो, हे देखील समजून घेतले पाहिजे. आयुर्वेदात शरीरातील असंतुलनाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार केले जाते. त्यामुळे इतर औषध घेण्यापेक्षा नेहमी आयुर्वेदिक उपचारांना प्राधान्य द्यावे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.