Monsoon Health | पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश!
पावसाळ्यात मुले अधिक आजारी पडतात. त्यामुळे या ऋतूत मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. मुलांच्या जेवणात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई: संपूर्ण देशात मान्सूनला सुरुवात झाली आहे. पावसाळा येताच लोक आजारी पडू लागतात. अशावेळी जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर पावसाळ्यात मुले अधिक आजारी पडतात. त्यामुळे या ऋतूत मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. मुलांच्या जेवणात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पावसाळ्यात मुलांना द्या ‘या’ गोष्टी
कारले
चवीला एकदम कडू असल्याने अनेकांना, त्यातले त्यात लहान मुलांना कारले खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की पावसाळ्यात कारले खाणे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल इत्यादी गुणधर्म असतात.
डाळी
पावसाळ्यात मुलांना निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात डाळींचा समावेश करू शकता. कारण डाळीमध्ये प्रथिने असतात जे उर्जेचा चांगला स्त्रोत आहे. त्याचबरोबर हंगामी संसर्गापासून संरक्षण आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे पावसाळ्यात डाळींचे सेवन अवश्य करावे.
हळदीचे दूध
पावसाळ्यात मुलांनी हळदीचे दूध अवश्य प्यावे. कारण यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात, म्हणून मुलांनी दररोज हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे.
ड्रायफ्रूट्स
पावसाळ्याच्या दिवसात मुलांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन अवश्य करावे. ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे मुलांच्या शरीराला ऊर्जावान ठेवतात. ज्यामुळे पावसाळ्यात मुले कमी आजारी पडतात. याचाही आहारात समावेश करावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)