तुमच्या मुलाला दूरचं पाहताना होतोय त्रास?..त्याला असू शकतो हा डोळ्यांचा आजार…
गेल्या दोन वर्षात मुलांच्या डोळ्याचा समस्या वाढल्या आहेत. कोरोनामुळे मुलं घरात आहेत. त्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरु आहे. अगदी अनेक क्लास ते मोबाईल, लॅपटॉप समोर तासंतास बसू असतात. येवढंच नाही तर फावल्या वेळेत टीव्ही पाहत बसलेली दिसतात. त्यामुळे त्यांचा डोळ्यावर ताण वाढला आहे. त्यामुळे काही मुलांना जवळच दिसण्यात त्रास होतोय. तर काहीना दूरचं दिसत नाही. अशा वेळी त्याला मायोपिया हा आजार झाल्याची शक्यता आहे.
मुंबई : लहान मुलांचे डोळे नाजूक असतात. त्यात गेल्या कोरोनामुळे ही मुलं सतत मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop) आणि गॅझेटच्या संपर्कात आहे. याचा परिणाम त्यांचा डोळ्यावर होताना दिसत आहे. काही मुलांना जवळचं तर काही मुलांना दूरचं दिसायला त्रास होतोय. दूरचं दिसायला त्रास होणं म्हणजे त्या मुलाला मायोपिया हा आजार झाला आहे. जसं जसं वय वाढत जातं हा त्रास वाढत जातो. लहान मुलांना अंधूक दिसायला लागतं अशावेळी नेत्रतज्ज्ञ लहान मुलांना मायनस नंबरचता चष्मा घालण्यास देतात.
मायोपिया आजार म्हणजे काय?
मायोपिया हा डोळ्यांचा आजार आहे. यामध्ये आपल्याला दूरच्या गोष्टी अंधूक दिसायला लागतात आणि यात आपल्याला मायनस नंबरचा चष्म्या घालावा लागतो. डोळ्याचे स्नायू कमकुवत झाल्यास किंवा डोळ्याचा पडद्यात दोष असल्यास हा आजार होतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून लहान मुलांमध्ये हा आजार बळावला आहे.
मायोपियाची लक्षणे
>> काही अंतरावरील वस्तू अंधूक दिसणे >> डोकेदुखीचा त्रास >> अंधारात वस्तू पाहण्यास त्रास >> मुलांचे सतत डोळे मिचकावणे >> वारंवार डोळे चोळणे >> वाचताना मळमळणे >> टिव्ही किंवा गॅझेट पाहताना जवळ बसणे >> वाचना किंवा लिहताना वाकून बसणे >> अभ्यासात लक्ष न लागल्यामुळे परीक्षेत कमी मार्क येणे, हेही लक्षण काही मुलांमध्ये दिसून आलं आहे.
या आजारावर डॉक्टर काय उपाय करतात
– ऑर्थो-के किंवा कॉर्नियल रिफ्रॅक्टिव्ह कॉन्टॅक्ट लेन्स – लेजर एसिस्टेाड इन सिटु केराटोमिलिउसिस – फोटोरिफ्रेक्टिव केराटेक्टोरमी – लेजर एपिथिलियल – केराटोमिलियस इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांट
आजार टाळण्यासाठी काय करता येईल
- जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.
- मोठ्यांसह लहान मुलांनी गॅझेट, मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीचा वापर कमी करावा
- नियमित डोळ्यांचा व्यायाम करावा
- वर्षांपासून दोन वेळा तरी नेत्र तपासणी करावी
- कुठल्याही गॅझेट, मोबाईल, लॅपटॉपचा वापर करताना झिरो नंबरचा चष्माचा वापर करावा.
- डोळ्यासाठी व्हिटॅमिन ई असलेले फळे खावीत
इतर बातम्या :