Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | Nails | नखं सांगतात ‘तुमचं आरोग्य कसं आहे?’ एका क्लिवर जाणून घ्या, काय सांगतात तुमची नखं?

नखं हे तुमचं सौंदर्य खुलविण्यात भर घालतं. नखांच्या सौंदर्यासाठी आपण खूप काही करतो. आजकाल नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का हे नखं तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी संकेत देतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

Health | Nails | नखं सांगतात 'तुमचं आरोग्य कसं आहे?' एका क्लिवर जाणून घ्या, काय सांगतात तुमची नखं?
Photo Courtesy - Google
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 1:30 PM

नखांच्या सौंदर्यासाठी (Nails) महिला खूप वेळ देतात. अगदी पार्लरमध्ये (Parlour) जाऊन पैसे खर्च करतात. पण तुम्हाला माहिती आहे, या नखांचा संबंध तुमच्या सौंदर्याशी तर आहेच, तसंच या नखांवरून तुम्हाला आरोग्याचे संकेतही मिळतात. हो! अगदी बरोबर. नखांवरून तुम्हाला आरोग्यासंबंधीत एक प्रकारे अलर्ट (Alert) मिळतो. चला तर जाणून घेऊयात या नखांचा आणि आरोग्याचा काय संबंध आहेत.

कोणत्या लक्षणांचे काय अर्थ?

पांढऱ्या रेषा – नखांवर असलेल्या पांढऱ्या रेषा या तुम्हाला किडनीसंबंधित समस्येबद्दल तुम्हाला संकेत देतात. त्यामुळे अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन यासंबंधीत माहिती द्या.

सॉफ्ट नखे – जर तुमची नखं सॉफ्ट आणि कमजोर वाटतात आहे, तर हे लिव्हरशी आजाराचे लक्षण आहे. किंवा शरीरात आयर्नची कमी असू शकतं. म्हणून डॉक्टरांकडे जा आणि काही टेस्ट करुन घ्या.

पिवळी नखे – जर तुमची नखे पिवळी पडली आहेत. तसंच ती सतत तुटत आहे तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण तुम्हाला फंगल इन्फेक्शनची समस्या असू शकते.

कोमजलेली नखे – कोमजलेले नखे हे लक्षण डायबिटीज आणि लिव्हरशी संबंधित आहे. तसंच हे लक्षण म्हणजे तुम्हाला एनीमियाचा त्रासही असू शकतो.

काळ्या रेषा किंवा डाग – तुमच्या हाताच्या किंवा पायाच्या नखावर काळा डाग असेल तर तुम्हाला मेलेनोमा असू शकतो. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करा.

नखांवर निळे डाग – शरीरात योग्यप्रमाणात ऑक्सिजनची कमी असल्यानेही असं डाग पडतात. म्हणजे असे डाग असणे म्हणजे तुम्हाला फुफ्फुसाची समस्या असू शकते.

त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे (Doctor) जा आणि त्यांना यासंबंधित माहिती द्या. त्यामुळे आपल्या नखांकडे लक्ष देणे गरजेचं आहे. नखांच्या सौंदर्यासोबत त्यात होणारे बदल हे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी संकेत देतात. ही लक्षणे तुम्हाला ओळखणे महत्त्वाची आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच यासाठी मदत करेल. जर तुम्हाला यापैकी कुठलेही लक्षण आढळल्यास घाबरून न जाता एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. काळजी घ्या आणि निरोगी राहा!

इतर बातम्या –

Winter Health Tips : सर्दी आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

Stretch Marks | स्ट्रेच मार्क्समुळे वैतागलात? हवे तसे कपडे घालता येत नाही? करा ‘हे’ घरगुती उपाय

Important | कोरोनाचा स्पर्मवर हल्ला! संशोधनातून खुलासा, कोरोनातून बरे झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

Health Care : वयाच्या तिशीनंतर ‘या’ डाळी खाणे आवश्यक, जाणून घ्या महत्वाची माहिती!

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.