NEET UG Counselling 2021 : नीट यूजी समुपदेशन कार्यक्रम जाहीर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा

NEET UG Counselling 2021 : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी नीट यूजी परीक्षा समुपदेशन कार्यक्रम जाहीर केला आहे.

NEET UG Counselling 2021 : नीट यूजी समुपदेशन कार्यक्रम जाहीर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 1:57 PM

NEET UG Counselling 2021 नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी नीट यूजी परीक्षा समुपदेशन कार्यक्रम जाहीर केला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठीच्या समुपदेशनास सुरुवात 19 जानेवारीपासून होणार असल्याची घोषणा मनसुख मांडवीय यांनी ट्विट द्वारे केली. वैद्यकीय समुपदेशन कमिटी (Medical Counselling Committee) यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी परीक्षेसाठी अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागांवर ऑनलाइन समुपदेशन सुरु करण्यात येणार आहे. विद्यार्थी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकतात. आरोग्यमंत्री मनसुख मांडवी यांच्याकडून पसंतीक्रम आणि सीट अलॉटमेंट यासंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नीट यूजी राज्य कोट्याअंतर्गत 192 मेडिकल कॉलेजमध्ये 23 हजार 378 एमबीबीएसच्या जागा उपलब्ध आहेत. तर, 272 सरकारी कॉलेजेसमध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या 41 हजार 388 आहे. एमबीबीएस साठी 83 हजार 75 बीडीएससाठी 26 हजार 949 आयुष्यासाठी 52 हजार 720 आणि बीवीएससी आणि एएचसाठी 603 एम्ससाठी 1899 जिपमर साठी 249 अशा जागा उपलब्ध आहेत. तर, समुपदेशनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mcc.nic.in या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

नीट समुपदेशन आला उशीर

समुपदेशनामध्ये होत असलेल्या उशिरा मुळे डॉक्टर्स नाराज होते. सुप्रीम कोर्टानं या संबंधी दिशानिर्देश दिल्यानंतर समुपदेशनातील येणाऱ्या अडचणी दूर झाल्या त्यानंतर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट पीजी कौन्सिलिंग च्या तारखा जाहीर केल्या आहेत.

नीट पीजी समुपदेशन कार्यक्रम सुरू

सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट पदव्युत्तर प्रवेशांसाठी समुपदेशन कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नीट पीजी समुपदेशन 12 जानेवारीपासून सुरू झालं आहे यावेळी नीट पिजी समुपदेशन चार फेऱ्यांमध्ये केले जाणार आहे.

एमबीबीएस कोर्स साठी जागा एकूण 192 सरकारी कॉलेज असून एमबीबीएससाठी अखिल भारतीय कोट्यामध्ये 4129 जागा उपलब्ध असतात. सर्व राज्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेशापैकी पंधरा टक्के कोटा हा ऑल इंडिया कोटा असतो. मेडिकल काऊन्सिलिंग कमिटीच्याच्या माध्यमातून अखिल भारतीय कोट्यातून पंधरा टक्के जागा भरल्या जातात. तर. राज्याच्या कोट्यातून 85 टक्के जागा भरल्या जातात. राज्याच्या जागा भरण्याची प्रक्रिया वेगळी आहे.

इतर बातम्या:

TET Exam Scam : पुणे पोलिसांंचं नवं टार्गेट, टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर

TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा

NEET UG Counselling 2021 to begin from January 19 NEET UG Registration And Counselling Schedule declared by Union Health Minister Mansukh Mandviya

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.