Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण, गेल्या 209 दिवसातील निचांक
गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 263 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 29 हजार 639 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 18 हजार 346 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 263 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या अडीच लाखांच्या घरात आहे. कालच्या दिवसातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा गेल्या 209 दिवसातील निचांकी ठरली आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 263 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 29 हजार 639 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 38 लाख 53 हजार 48 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 49 हजार 260 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 52 हजार 902 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 91 कोटी 54 लाख 65 हजार 826 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 18,346
देशात 24 तासात डिस्चार्ज – 29,639
देशात 24 तासात मृत्यू – 263
एकूण रूग्ण – 3,38,53,048
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,52,902
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,31,50,886
एकूण मृत्यू – 4,49,260
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 91,54,65,826
गेल्या 24 तासातील लसीकरण –
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 18,346 नए मामले आए, 29,639 रिकवरी हुईं और 263 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,38,53,048 सक्रिय मामले: 2,52,902 कुल रिकवरी: 3,31,50,886 कुल मौतें: 4,49,260 कुल वैक्सीनेशन: 91,54,65,826 pic.twitter.com/1qGLzi0U67
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2021
COVID19 | India reports 18,346 new cases in the last 24 hours; lowest in 209 days; Active caseload stands at 2,52,902. Recovery rate currently at 97.93%: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/YImT23Ekqp
— ANI (@ANI) October 5, 2021
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे
संबंधित बातम्या :
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज