Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजारांच्या घरात, सलग दुसऱ्या दिवशी आकडे कमी
गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 870 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 378 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 28 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली, मात्र सलग दुसऱ्या दिवशी हा आकडा 18 हजारांच्या घरात राहिला आहे. कालच्या दिवसात देशात 18 हजार 870 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 378 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तीन लाखांच्या खाली आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 870 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 378 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 28 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 37 लाख 16 हजार 451 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 86 हजार 180 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 47 हजार 751 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 82 हजार 520 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 87 कोटी 66 लाख 63 हजार 490 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 18,870
देशात 24 तासात डिस्चार्ज – 28,178
देशात 24 तासात मृत्यू – 378
एकूण रूग्ण – 3,37,16,451
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,82,520
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,29,86,180
एकूण मृत्यू – 4,47,751
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 87,66,63,490
गेल्या 24 तासातील लसीकरण – 54,13,332
India reports 18,870 new #COVID19 cases, 28,178 recoveries, and 378 deaths in the last 24 hrs as per Union Health Ministry
Total cases 3,37,16,451 Total recoveries 3,29,86,180 Death toll 4,47,751 Active cases 2,82,520
Total vaccination 87,66,63,490 (54,13,332 in last 24 hrs) pic.twitter.com/bZ0aM3U6lX
— ANI (@ANI) September 29, 2021
कालच्या दिवसात देशात सापडलेल्या 18 हजार 870 नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी केरळ राज्यात 11 हजार 196 रुग्णांची नोंद झाली. तर 378 कोरोनाबळींपैकी केरळातील 149 जणांचा समावेश आहे.
Out of 18,870 new #COVID19 cases & 378 deaths across India, 11,196 cases & 149 deaths were reported in Kerala, yesterday.
— ANI (@ANI) September 29, 2021
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे
संबंधित बातम्या :
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज