Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 हजारांखाली, पाच महिन्यांतील नीच्चांक
गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 166 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 437 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 830 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 7 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 25 हजार 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. हा गेल्या पाच महिन्यांतील (154 दिवस) नीच्चांक आहे. कालच्या दिवसात 437 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खालीच आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 166 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 437 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 830 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 22 लाख 50 हजार 679 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 48 हजार 754 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 32 हजार 79 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 69 हजार 846 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 55 कोटी 47 लाख 30 हजार 609 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 25,166
देशात 24 तासात डिस्चार्ज – 36,830
देशात 24 तासात मृत्यू – 437
एकूण रूग्ण – 3,22,50,679
एकूण डिस्चार्ज – 3,14,48,754
एकूण मृत्यू – 4,32,079
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,69,846
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 55,47,30,609
गेल्या 24 तासातील लसीकरण – 88,13,919
COVID-19 | India reports 25,166 new cases in the last 24 hours, lowest in 154 days. Active cases decline to 3,69,846, lowest in 146 days; recovery at 97.51% pic.twitter.com/IPE5ABHSLd
— ANI (@ANI) August 17, 2021
संबंधित बातम्या :
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले
सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?