Corona Cases In India | देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट, सक्रिय कोरोनाग्रस्तांमध्येही घसरण
गेल्या 24 तासात भारतात 26 हजार 115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 252 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 469 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 26 हजार 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 252 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 26 हजार 115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 252 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 469 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 35 लाख 4 हजार 534 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 49 हजार 574 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 45 हजार 385 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 9 हजार 575 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 81 कोटी 85 लाख 13 हजार 827 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 26,115
देशात 24 तासात डिस्चार्ज – 34,469
देशात 24 तासात मृत्यू – 252
एकूण रूग्ण – 3,35,04,534
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,09,575
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,27,49,574
एकूण मृत्यू – 4,45,385
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 81,85,13,827
गेल्या 24 तासातील लसीकरण – 96,46,778
India reports 26,115 new #COVID19 cases, 252 deaths & 34,469 recoveries in last 24 hrs, says Health Ministry
Total Cases: 3,35,04,534 Total Active cases: 3,09,575 Total Recoveries: 3,27,49,574 Total Death toll: 4,45,385
Total vaccination: 81,85,13,827 (96,46,778 in 24 hrs) pic.twitter.com/CzL8Ugj7lq
— ANI (@ANI) September 21, 2021
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे
संबंधित बातम्या :
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज