Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 147 दिवसातील निचांकी आकडा, सक्रिय रुग्णही चार लाखांच्या खाली
गेल्या 24 तासात भारतात 28 हजार 204 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 373 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 511 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत सात हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 28 हजार 204 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या 147 दिवसातील हा नव्या कोरोनाग्रस्तांचा निचांकी आकडा आहे. कालच्या दिवसात 373 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. अॅक्टिव्ह कोरोना केसेसची संख्याही गेल्या 139 दिवसातील सर्वात निचांकी स्तरावर आहे. बरेच दिवसांनी सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली गेली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 28 हजार 204 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 373 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 511 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 19 लाख 98 हजार 158 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 11 लाख 80 हजार 968 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 28 हजार 682 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 88 हजार 508 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 51 कोटी 45 लाख 00 हजार 268 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 28,204
देशात 24 तासात डिस्चार्ज – 41,511
देशात 24 तासात मृत्यू – 373
एकूण रूग्ण – 3,19,98,158
एकूण डिस्चार्ज – 3,11,80,968
एकूण मृत्यू – 4,28,682
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,88,508
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 51,45,00,268
गेल्या 24 तासातील लसीकरण – 54,91,647
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 28,204 नए मामले आए, 41,511 रिकवरी हुईं और 373 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,19,98,158 सक्रिय मामले: 3,88,508 कुल रिकवरी: 3,11,80,968 कुल मौतें: 4,28,682 pic.twitter.com/prsAFEUtHq
— ANI_HindiNews (@AHindinews) August 10, 2021
संबंधित बातम्या :
अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस