Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजाराच्या घरात, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 948 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 403 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 487 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजाराच्या घरात, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 10:01 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 5 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 30 हजार 948 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 403 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या साडेतीन लाखांच्या आसपास आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 948 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 403 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 487 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 24 लाख 24 हजार 234 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 36 हजार 469 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 34 हजार 367 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 53 हजार 398 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 58 कोटी 14 लाख 89 हजार 377 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 30,948

देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,487

देशात 24 तासात मृत्यू – 403

एकूण रूग्ण – 3,24,24,234

एकूण डिस्चार्ज – 3,16,36,469

एकूण मृत्यू – 4,34,367

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,53,398

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 58,14,89,377

गेल्या 24 तासातील लसीकरण – 52,23,612

संबंधित बातम्या :

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.