Corona Cases In India | स्वातंत्र्यदिनी दिलासा, देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्याही घसरली

गेल्या 24 तासात भारतात 36 हजार 83 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 493 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 37 हजार 927 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | स्वातंत्र्यदिनी दिलासा, देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्याही घसरली
corona
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 10:03 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे. कालच्या दिवसात 36 हजार 83 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 493 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खालीच आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 36 हजार 83 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 493 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 37 हजार 927 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 21 लाख 92 हजार 576 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 76 हजार 15 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 31 हजार 225 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 85 हजार 336 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 54 कोटी 38 लाख 46 हजार 290 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 36,083

देशात 24 तासात डिस्चार्ज – 37,927

देशात 24 तासात मृत्यू – 493

एकूण रूग्ण – 3,21,92,576

एकूण डिस्चार्ज – 3,13,76,015

एकूण मृत्यू – 4,31,225

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,85,336

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 54,38,46,290

गेल्या 24 तासातील लसीकरण – 73,50,553

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.