नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 171 ने वाढ झाली. कालच्या दिवसात 36 हजार 571 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 540 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खाली (150 दिवसांतील निचांकी) आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 540 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 555 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 23 लाख 58 हजार 829 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 61 हजार 635 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 33 हजार 622 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 63 हजार 605 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 56 कोटी 64 लाख 88 हजार 433 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 36,571
देशात 24 तासात डिस्चार्ज – 36,555
देशात 24 तासात मृत्यू – 540
एकूण रूग्ण – 3,23,58,829
एकूण डिस्चार्ज – 3,15,61,635
एकूण मृत्यू – 4,33,622
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,63,605
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 56,64,88,433
गेल्या 24 तासातील लसीकरण – 56,36,336
COVID19 | India registers 36,571 new cases in the last 24 hours; Active caseload stands at 3,63,605; lowest in 150 days. Recovery rate increases to 97.54%: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/wuTcljM2Sw
— ANI (@ANI) August 20, 2021
संबंधित बातम्या :
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले
सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?