Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, सक्रिय रुग्णसंख्याही वाढली

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 361 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 416 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 968 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, सक्रिय रुग्णसंख्याही वाढली
CORONA
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 10:04 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 400 ने घट झाली. कालच्या दिवसात 39 हजार 361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यासोबतच अॅक्टिव्ह केसेसमध्येही तीन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 416 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 361 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 416 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 968 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 14 लाख 11 हजार 262 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 79 हजार 106 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 20 हजार 967 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 11 हजार 189 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 43 कोटी 51 लाख 96 हजार 1 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 39,361

देशात 24 तासात डिस्चार्ज – 35,968

देशात 24 तासात मृत्यू – 416

एकूण रूग्ण – 3,14,11,262

एकूण डिस्चार्ज – 3,05,79,106

एकूण मृत्यू – 4,20,967

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,11,189

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 43,51,96,001

गेल्या 24 तासातील लसीकरण – 18,99,874

संबंधित बातम्या :

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?

(New 39361 Corona Cases in India in the last 24 hours)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.