Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवरच, कोरोनाबळी 3500 ने घटले

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 652 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवरच, कोरोनाबळी 3500 ने घटले
CORONA
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 9:54 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 1 हजाराने घट झाली. कालच्या दिवसात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काही दिवसांपूर्वी तीस हजारापर्यंत खाली पोहोचला होता, मात्र त्यानंतर पुन्हा होत असलेली वाढ धडकी भरवणारी आहे. सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही सलग दोन दिवस वाढ होत आहे. आदल्या दिवशी 3 हजार 998 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले होते. हा आकडा काल पुन्हा जवळपास 3500 नी घटून 507 वर आला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 652 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 12 लाख 57 हजार 720 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 4 लाख 29 हजार 339 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 18 हजार 987 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 9 हजार 394 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 41 कोटी 78 लाख 51 हजार 151 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 41,383

देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,652

देशात 24 तासात मृत्यू – 507

एकूण रूग्ण – 3,12,57,720

एकूण डिस्चार्ज – 3,04,29,339

एकूण मृत्यू – 4,18,987

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,09,394

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 41,78,51,151

संबंधित बातम्या :

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?

 मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग

(New 41383 Corona Cases in India in the last 24 hours)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.