Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, सक्रिय रुग्णही अधिक, कोरोनाबळींत मात्र घट

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 806 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 581 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 130 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, सक्रिय रुग्णही अधिक, कोरोनाबळींत मात्र घट
CORONA
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 9:58 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 41 हजार 806 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 581 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 806 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 581 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 130 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 9 लाख 87 हजार 880 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 1 लाख 43 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 11 हजार 989 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 32 हजार 41 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 39 कोटी 13 लाख 40 हजार 491 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 41,806

देशात 24 तासात डिस्चार्ज – 39,130

देशात 24 तासात मृत्यू – 581

एकूण रूग्ण – 3,09,87,880

एकूण डिस्चार्ज – 3,01,43,850

एकूण मृत्यू – 4,11,989

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,32,041

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 39,13,40,491

24 तासात लसीकरण झालेली संख्या – 34,97,058

संबंधित बातम्या :

नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, तृतीयपंथीयांच्या लसीकरणाला जातीने हजेरी

दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार; राजेश टोपेंचं मोठं विधान

(New 41806 Corona Cases in India in the last 24 hours)

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.