नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 12 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 42 हजार 625 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 562 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 625 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 562 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 668 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 17 लाख 69 हजार 132 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 33 हजार 22 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 25 हजार 757 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 10 हजार 353 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 48 कोटी 52 लाख 86 हजार 570 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,625
देशात 24 तासात डिस्चार्ज – 36,668
देशात 24 तासात मृत्यू – 562
एकूण रूग्ण – 3,17,69,132
एकूण डिस्चार्ज – 3,09,33,022
एकूण मृत्यू – 4,25,757
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,10,353
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 48,52,86,570
गेल्या 24 तासातील लसीकरण – 62,53,741
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 42,625 नए मामले आए, 36,668 रिकवरी हुईं और 562 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,17,69,132
सक्रिय मामले: 4,10,353
रिकवरी: 3,09,33,022
मौतें: 4,25,757 pic.twitter.com/DXMLOQJ6oP— ANI_HindiNews (@AHindinews) August 4, 2021
संबंधित बातम्या :
अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस
(New 42625 Corona Cases in India in the last 24 hours)