Corona Cases In India | देशात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 3.76 लाखांपार, केरळने टेंशन वाढवलं

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 909 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380  रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 3.76 लाखांपार, केरळने टेंशन वाढवलं
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 10:35 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 42 हजार 909 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकट्या केरळमध्येच 29,836 नवे रुग्ण सापडले असून राज्यात 75 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.  कालच्या दिवसात देशात 380 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असून आता 3.76 लाखांच्या पार गेली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची धाकधूक वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 909 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380  रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 26 लाख 91 हजार 180 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 37 हजार 701 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 76 हजार 324 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 63 कोटी 43 लाख 81 हजार 358 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,909

देशात 24 तासात डिस्चार्ज – 34,763

देशात 24 तासात मृत्यू – 380

एकूण रूग्ण – 3,26,91,180

एकूण डिस्चार्ज – 3,19,23,405

एकूण मृत्यू – 4,37,701

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,76,324

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 63,43,81,358

गेल्या 24 तासातील लसीकरण – 31,14,696

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय

दरम्यान, महाराष्ट्रात काल 4 हजार 666 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले, तर 131 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 510 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 3378, ठाण्यात 7283, तर पुण्यात 13 हजार 503 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

देशात तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय? नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.