Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या

गेल्या 24 तासात भारतात 45 हजार 892 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 817 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 291 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या
Corona Update
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 9:42 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 45 हजार 892 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 817 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. अ‍ॅक्टिव्ह केसेसही एक हजाराने वाढल्या असून एकूण रुग्णसंख्येच्या त्या 1.5 टक्के इतक्या आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 45892 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 45 हजार 892 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 817 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 291 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 7 लाख 9 हजार 557 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 5 हजार 28 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 60 हजार 704 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 36 कोटी 48 लाख 47 हजार 549 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 45,892

देशात 24 तासात डिस्चार्ज – 44,291

देशात 24 तासात मृत्यू – 817

एकूण रूग्ण –  3,07,09,557

एकूण डिस्चार्ज – 2,98,43,825

एकूण मृत्यू – 4,05,028

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,60,704

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 36,48,47,549

संबंधित बातम्या :

लसीकरणानंतरचे साईड इफेक्ट्स दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

भारताची नवी कोरोना लस ZyCov-D, तीन डोस घ्यावे लागणार, सुई विना लसीकरण, वाचा सविस्तर

(New 45892 Corona Cases in India in the last 24 hours)

VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर.
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्.
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.