Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट, कोरोनाबळी एक हजाराखाली

गेल्या 24 तासात भारतात 46 हजार 148 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 979 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 58 हजार 578 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट, कोरोनाबळी एक हजाराखाली
CORONA
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 10:41 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 46 हजार 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 979 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 46146 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 46 हजार 148 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 979 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 58 हजार 578 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 9 हजार 607 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 96 हजार 730 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 72 हजार 994 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 46,148

देशात 24 तासात डिस्चार्ज – 58,578

देशात 24 तासात मृत्यू – 979

एकूण रूग्ण –  3,02,79,331

एकूण डिस्चार्ज – 2,93,09,607

एकूण मृत्यू – 3,96,730

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,72,994

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 32,36,63,297

एका दिवसातील लसीकरण – 17,21,268

संबंधित बातम्या :

संभाव्य तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांसाठी गुड न्यूज, पुण्यात सीरम Covovax ची चाचणी सुरु करणार

Special Report | डेल्टा विषाणूचा धोका , पण लसीच एक्का!

(New 46146 Corona Cases in India in the last 24 hours)

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.