Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ, कोरोनाबळीही पुन्हा हजारापार

गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1005 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 61 हजार 588 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ, कोरोनाबळीही पुन्हा हजारापार
corona virus
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:03 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 48 हजार 786 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1005 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 48786 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1005 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 61 हजार 588 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 4 लाख 11 हजार 634 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 88 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 99 हजार 459 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 23 हजार 257 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 48,786

देशात 24 तासात डिस्चार्ज – 61,588

देशात 24 तासात मृत्यू – 1,005

एकूण रूग्ण –  3,04,11,634

एकूण डिस्चार्ज – 2,94,88,918

एकूण मृत्यू –  3,99,459

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,23,257

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 33,57,16,019

संबंधित बातम्या :

कोरोना लसीचा पुरवठा नाही, पुणे शहरात महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रं बंद

 लसीकरण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये उघडणे शक्य नाही : उदय सामंत

(New 48786 Corona Cases in India in the last 24 hours)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.