Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर, एकूण रुग्ण तीन कोटींपार

गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 848 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 358 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 68 हजार 817 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर, एकूण रुग्ण तीन कोटींपार
Corona
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 9:33 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 50 हजार 848 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 358 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 50848 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 848 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 358 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 68 हजार 817 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 28 हजार 709 वर गेला आहे. देशात 2 कोटी 89 लाख 94 हजार 855 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 90 हजार 660 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 6 लाख 43 हजार 194 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 29 कोटी 46 लाख 39 हजार 511 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 50,848

देशात 24 तासात डिस्चार्ज – 68,817

देशात 24 तासात मृत्यू – 1,358

एकूण रूग्ण –  3,00,28,709

एकूण डिस्चार्ज – 2,89,94,855

एकूण मृत्यू – 3,90,660

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 6,43,194

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 29,46,39,511

एका दिवसातील लसीकरण – 54,24,374

रिकव्हरी दर – 96.56%

दैनिक पॉझिटिव्हिटी रेट – 2.67%

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस

भारतीयांना आणखी लस मिळणार, फायजरला लवकरच मंजुरी मिळणार, कंपनीच्या सीईओचा दावा

(New 50848 Corona Cases in India in the last 24 hours)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.