Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, कोरोनाबळींत किंचीत घट

गेल्या 24 तासात भारतात 54 हजार 69 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 321 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 68 हजार 885 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, कोरोनाबळींत किंचीत घट
Corona
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 9:45 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 54 हजार 69 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 321 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 54069 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 54 हजार 69 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 321 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 68 हजार 885 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 82 हजार 778 वर गेला आहे. देशात 2 कोटी 90 लाख 63 हजार 740 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 91 हजार 981 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 6 लाख 27 हजार 57 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 30 कोटी 16 लाख 26 हजार 28 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 54,069

देशात 24 तासात डिस्चार्ज – 68,885

देशात 24 तासात मृत्यू – 1,321

एकूण रूग्ण –  3,00,82,778

एकूण डिस्चार्ज –2,90,63,740

एकूण मृत्यू – 3,91,981

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 6,27,057

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 30,16,26,028

एका दिवसातील लसीकरण – 64,89,599

दैनिक पॉझिटिव्हिटी रेट – 2.91%

संबंधित बातम्या :

भारतीयांना आणखी लस मिळणार, फायजरला लवकरच मंजुरी मिळणार, कंपनीच्या सीईओचा दावा

कोरोनाची लस घ्या आणि स्वस्तात विमान प्रवास करा; जाणून घ्या सर्वकाही

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.