Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींचा आकडा 1600 च्या खाली

गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 480 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 587 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 88 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींचा आकडा 1600 च्या खाली
Corona
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 9:52 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 62 हजार 480 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 587 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या 73 दिवसांनी 8 लाखांच्या खाली आली आहे. (New 62480 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 480 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 587 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 88 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 97 लाख 62 हजार 793 वर गेला आहे. देशात 2 कोटी 85 लाख 80 हजार 647 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 83 हजार 490 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 7 लाख 98 हजार 656 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 26 कोटी 89 लाख 60 हजार 399 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 62,480

देशात 24 तासात डिस्चार्ज – 88,977

देशात 24 तासात मृत्यू – 1,587

एकूण रूग्ण –  2,97,62,793

एकूण डिस्चार्ज – 2,85,80,647

एकूण मृत्यू – 3,83,490

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 7,98,656

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 26,89,60,399

संबंधित बातम्या :

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

(New 62480 Corona Cases in India in the last 24 hours)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.