Blood Test | रक्त चाचणीतूनही होणार कॅन्सरचे निदान, शरीरात कर्करोग किती पसरलाय, हेही समजणार

वैज्ञानिकांनी अश्या प्रकारची ब्लड टेस्ट शोधून काढली आहे ज्याद्वारे आपल्याला कॅन्सर झाला आहे की नाही? याची माहिती मिळू शकते. ही पहिलीच ब्लड टेस्ट आहे ज्याद्वारे कॅन्सर बद्दलची माहिती आपल्याला कळेल सोबतच हा आजार आपल्या शरीरात किती प्रमाणामध्ये पसरलेला आहे याची माहिती देखील या ब्लड टेस्टद्वारे समजू शकेल.ही ब्लड टेस्ट कशा पद्धतीने करते कार्य, जाणून घेऊया...

Blood Test | रक्त चाचणीतूनही होणार कॅन्सरचे निदान, शरीरात कर्करोग किती पसरलाय, हेही समजणार
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 9:42 AM

मुंबई : वैज्ञानिकांनी अशाप्रकारची ब्लड टेस्ट शोधून काढली आहे ,ज्याद्वारे शरीरात झालेले कॅन्सर बद्दलची माहिती मिळू शकते. ही अशी पहिली ब्लड टेस्ट आहे जी आपल्याला कॅन्सर बद्दल माहिती देईल सोबतच आपल्या शरीरामध्ये कॅन्सर पसरलेला आहे की नाही याबद्दल सुद्धा उचित माहिती सांगेल. सध्या तरुणांमधील कॅन्सरची तपासणी करण्यासाठी कोलोनास्‍कोपी, मेमोग्राफी आणि पैप टेस्‍ट या टेस्टच्या साह्याने केली जाते. या नवीन टेस्टच्या सहाय्याने कॅन्सरची तपासणी करणे अतिशय सोपे होणार आहे.

या टेस्टला निर्माण करणारे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या तपासणी द्वारे रुग्णांमधील मेटा स्टॅटिक कॅन्सर बद्दल माहिती मिळू शकते. हा एक कॅन्सरचा अतिशय भयंकर असलेला प्रकार आहे जो आपल्या शरीरामध्ये वेगाने पसरतो. या टेस्टची विशेषता काय आहे, कसे करते कार्य ?? जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे..

कशा पद्धतीने काम करते हे नवीन ब्लड टेस्ट

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नुसार नवीन लेटेस्ट किती यशस्वी ठरणार आहे हे समजून घेण्यासाठी 300 रुग्णांचे सॅम्पल घेतले गेले यातील 94% रुग्णांच्या शरीरातील कॅन्सरची तपासणी यशस्वीरित्या झालेली आहे तसेच या टेस्ट मुळे कॅन्सर बद्दलची माहिती सुद्धा प्राप्त झाली. या ब्लड टेस्ट मध्ये एक विशेष प्रकारच्या पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे,ज्याला NMR मेटाबोलोमिक्‍स असे म्हणतात.

शास्त्रज्ञ डॉ. जेम्‍स लार्किन सांगतात की, मानवी शरीरात अनेक प्रकारचे केमिकल बनत असतात,त्यांना बायोमर्कर असे म्हणतात यांची तपासणी करून मानवी शरीराबद्दल खूप सारी माहिती प्राप्त करता येते.नवीन ब्लड टेस्ट करून मानवी शरीरातील मधील असे काही बायोमार्कस ओळखले जातील ज्यामुळे आपल्याला त्वरित कळेल की मनुष्य कॅन्सरशी पीडित आहे की नाही. कॅन्सर झाल्यावर शरीरामध्ये काही विशेष प्रकारचे बायोमार्कर्स निर्माण होतात, ब्लड टेस्ट च्या माध्यमातून यांनाच ओळखले जाते.

रुग्णांना कसा मिळेल आराम ?

सध्याच्या काळामध्ये रुग्णांना कॅन्सरची तपासणी करण्यासाठी अनेक प्रकारची टेस्ट करावे लागते, जे की खूप महाग आहेत. या सोबतच या सगळ्या टेस्ट करण्यासाठी कालावधी सुद्धा जास्त लागतो. रुग्णांसाठी हि टेस्ट अतिशय लवकर होणारी टेस्ट असा एक पर्याय सुद्धा उपलब्ध होऊ शकतो कारण ती ब्लड सँपल घेणे अतिशय सोपे असते.

शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की ही ब्लड टेस्ट अशा रुग्णांमध्ये सुद्धा केली जाऊ शकते त्यांच्यामध्ये नॉन स्पेसिफिक लक्षणे दिसत आहेत ज्यांचे लक्षणं किंवा कधीकधी ओळखणे शक्य होत नाही त्याचबरोबर यांच्या शरीरामध्ये कॅन्सरचे प्रमाण आहे कि नाही हे सुद्धा वर्तवणे कधी कधी कठीण होऊन जाते. जसे की नेहमी थकवा जाणवतो आणि वेगाने वजन कमी होते अशी सुद्धा लक्षणे अनेकदा असू शकतात.

शास्त्रज्ञ लार्किन म्हणतात की, या ब्लड टेस्ट साठी फंडिंग तयार करणे हे आमचे पुढील लक्ष्य असेल याशिवाय पुढील क्लिनिकल ट्रायल मध्ये तीन वर्षांमध्ये दोन ते तीन हजार रुग्णांची तपासणी केली जाईल. या सर्व तपासणी फंडिंगवर अवलंबून राहतील. या आधारावरच आम्हाला रेग्‍युलेटरी अथॉरिटी कडून मान्यता मिळेल आणि या टेस्ट द्वारे सर्वसाधारण जनतेची टेस्ट केली जाईल. मान्यता मिळाल्यानंतरच सर्वसाधारण लोकांसाठी कॅन्सरची तपासणी करणे अतिशय सोपे होणार होईल.

संबंधित बातम्या :

हिवाळ्याच्या हंगामात खजूर जरूर खा, अनेक फायदे होतील!

योगा क्लासला जाण्यापूर्वी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

लघवीतून पुरुषांमध्ये भयंकर इन्फेक्शन! हे तुम्हाला माहीत असेल, पण असं का होतं हे माहितीये?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.