नवलच! मुंबईत महिला डॉक्टरला 14 महिन्यात तीनदा कोरोना, वॅक्सिन घेतल्यानंतरही दोनदा लागण, नेमकं काय घडलंय?

'मी स्वत: डॉक्टर आहे. त्यामुळे मलाही हे सांगता येत नाही की, नव्यानं कोरोना झालाय की जुनाच कोरोना पुन्हा सक्रिय झाला. म्हणजे इम्युनिटी कमी झाल्यानंतर. आता तर माझं पूर्ण कुटुंबही पॉजिटीव्ह आलंय'.

नवलच! मुंबईत महिला डॉक्टरला 14 महिन्यात तीनदा कोरोना, वॅक्सिन घेतल्यानंतरही दोनदा लागण, नेमकं काय घडलंय?
डॉ. सृष्टी हलारींना 14 महिन्यात तीनदा कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 8:31 PM

कोरोनाच्या आतापर्यंत अनेक कथा आणि भाकड कथा आपण ऐकल्या असतील. त्यातल्या काही खऱ्या, काही खोट्या ठरल्या. पण मुंबईतली आता अशी एक कोरोनाची केस समोर आलीय जी शंभर टक्के खरी आहे. एका महिला डॉक्टरला गेल्या 14 महिन्यात तीनदा कोरोना झालाय. विशेष म्हणजे वॅक्सिन घेतल्यानंतर दोन वेळा कोरोनाची लागण झालेली आहे. डॉ. सृष्टी हलारी असं महिला डॉक्टरचं नाव आहे.

डॉ. सृष्टी हलारी यांना 17 जून 2020 रोजी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पुन्हा 29 मे 2021 रोजी झाली आणि त्यानंतर आता 11 जुलै 2021 रोजी कोरोनानं गाठलं. विशेष म्हणजे डॉ. सृष्टींनी मे महिन्याच्या आधीच कोरोनाचे दोन डोस घेतलेले आहेत.

तीन वेळा कोरोना लागण, कारण काय? डॉ. सृष्टी हलारीची ही कोरोना केस देशातली पहिली घटना आहे. त्यामुळेच जीनोम सिक्वन्सिंगसाठी त्यांचं सँपल घेतलं गेलंय. डॉ. सृष्टी ह्या मुलूंडला राहतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तीन वेळा कोरोनाची लागण झालीच कशी? तर डॉक्टरचं त्याची विविध उत्तरं देतायत. त्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट तसच इम्युनिटी लेवल किंवा कोरोनाची तपासणी रिपोर्टमध्ये काही तरी गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

डॉ. हलारींचे दोन सँपल घेतले गेलेत. एक BMC ने घेतलाय आणि दुसरा प्रायव्हेटमध्ये. कारण, वॅक्सिनेशन नंतरही कोरोनाची लागण कशी काय झाली याचा तपास याच माध्यमातून केला जातोय. हे दोन्ही रिपोर्ट अजून येणं बाकी आहे.

डॉ. सृष्टी हलारीचं म्हणणं काय? टीव्ही 9 शी बोलताना डॉ. सृष्टीनं सांगितलं की, त्यांना पहिल्यांदा कोरोना झाला त्यावेळेस त्या कोरोना वॉर्डात काम करायच्या, त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्यांच्या कुटुंबियांचीही टेस्ट केली पण ते सर्व नेगेटीव्ह आले. फक्त सृष्टी कोरोनाग्रस्त झाल्या. कुठलीही लक्षणं नव्हती. दुसऱ्यांदा त्यांना कोरोना झाला त्यावेळेस मात्र काही हलकी लक्षणं होती. टेस्ट केल्यानंतर कोरोना डिटेक्ट झाला. डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यानं आश्चर्य वाटलं. उपाय केले.

तिसऱ्यांदा मात्र तापानं फणफणल्या डॉ. सृष्टी म्हणाल्या की, एके दिवशी अचानक मला घशात खरखर व्हायला लागली. त्याच रात्री डोकं दुखायला लागलं. तीही साधी डोकेदुखी नव्हती. अशी डोकेदुखी मी आयुष्यात कधीच अनुभवलेली नव्हती. सर्दी झाली, खोकलाही सुरु झाला. मला पहिल्या दोन्ही वेळेस असं कधीच झालेलं नव्हतं. म्हणजे 29 मे रोजी जो ताप होता तो माईल्ड होता, 11 जुलैच्या तपासणीत हाच ताप मॉडरेट झालेला होता. म्हणजे तो शंभरच्या वर गेलेला होता. बरं मी फॅबी फ्लू, विटामीन अशी सगळी औषधं घेतली होती. त्यानंतरही तिसऱ्या चाचणीच्या वेळेस सगळी लक्षणं स्ट्राँग होती. मी स्वत: डॉक्टर आहे. त्यामुळे मलाही हे सांगता येत नाही की, नव्यानं कोरोना झालाय की जुनाच कोरोना पुन्हा सक्रिय झाला. म्हणजे इम्युनिटी कमी झाल्यानंतर. आता तर माझं पूर्ण कुटुंबही पॉजिटीव्ह आलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.