ब्रिटनमध्ये कोरोना स्ट्रेनचा कहर सुरु; कुठल्या देशात काय बंद? भारतात काय परिस्थिती?

ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा स्ट्रेन आता चांगलाच वाढला आहे. फ्रान्स, कॅनडा, इटली, नेदरलँड, बेल्झियम, चिली, बुल्गेरिया, आर्यलँड, जर्मनी या देशांना अत्यंत कडक पावलं उचलली आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना स्ट्रेनचा कहर सुरु; कुठल्या देशात काय बंद? भारतात काय परिस्थिती?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 4:33 PM

मुंबई: ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा स्ट्रेन आता चांगलाच वाढला आहे. फ्रान्स, कॅनडा, इटली, नेदरलँड, बेल्झियम, चिली, बुल्गेरिया, आर्यलँड, जर्मनी या देशांना अत्यंत कडक पावलं उचलली आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत. त्यापाठोपाठ आता सौदी अरबनंही कडक पावलं उचलतं सगळे आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डान रद्द केलंय. हा स्ट्रेन कायम असेपर्यंत उड्डानांवर स्थगिती असेल असं सौदीच्या प्रशासनानं सांगितलंय. (New Strain of Coronavirus in UK: know so far All Update about new coronavirus)

सौदीत जलवाहतुकीवरही बंदी

सौदी अरब यावरच थांबला नाही, तर त्यानं परदेशातून होणाऱ्या जलवाहतुकीवरही बंदी घातलीय. याशिवाय मागील ३ महिन्यात युरोपातून परतलेल्या सर्वांची कोविड चाचणी करण्यासह त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आलेत. असं असलं तरी मालवाहू विमान आणि जहाजांच्या वाहतुकीला यातून सूट दिली गेलीय

कॅनडानंही ब्रिटेनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली

ब्रिटनमध्ये सध्या कोरोना स्ट्रेनचा अत्याधिक प्रभाव पाहायला मिळतोय. त्यामुळं ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांची विमानतळांवर कडक तपासणी सुरुय. एवढंच नाही तर अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व उड्डानं स्थगित केली आहेत. यामध्ये कॅनडासह नेदरलँड, बेल्झियम, ऑस्ट्रिया, आर्यलँड आणि बुल्गेरियाचा समावेश आहे.

ख्रिसमसवर कोरोना स्ट्रेनचा सावट

युरोपासह ब्रिटनमध्येही ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोना संपुष्टात येत असल्याच्या आकडेवारीनंतर अनेकांनी ख्रिसमस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची तयारी केली होती. मात्र, कोरोना स्ट्रेनच्या फैलावामुळं अनेक देश सावध झाले आहेत. ब्रिटनमध्ये तर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे आदेश पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी दिले आहेत. याशिवाय सर्व ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.

70 टक्के वेगानं वाढतोय कोरोना स्ट्रेन

आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा तब्बल 70 टक्के वेगानं या कोरोना स्ट्रेनचा प्रसार होत असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळं जगाची चिंता चांगलीच वाढली आहे. लंडनसह दक्षिणी इंग्लंडमध्ये या कोरोना स्ट्रेनचा फैलाव अतिशय वेगाना झाला आहे. ब्रिटनची सगळी आरोग्य व्यवस्था हा स्ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. (New Strain of Coronavirus in UK: know so far All Update about new coronavirus)

कोरोना लस स्ट्रेनवर प्रभावी ठरणार?

कोरोनाची लस कोरोना स्ट्रेनवर प्रभावी ठरणार का? हा सध्या जगातल्या अनेक देशांना पडलेला प्रश्न आहे. कारण, लस ही कोरोनाच्या आधीच्या लक्षणांवर बनवली गेली आहे. त्यामुळं या कोरोना स्ट्रेनवर ती किती प्रभावी ठरते हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शास्रज्ञांच्या मते, कोरोनाची लस ही स्ट्रेनचा खात्मा करु शकते. कोरोना लसीमुळं प्रतिकारशक्ती वाढते, त्याचा परिणाम कोरोना स्ट्रेनलाही संपवण्यात होऊ शकतो.

कोरोना स्ट्रेनबद्दल भारतात काय परिस्थिती?

ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेनचं गांभीर्य लक्षात घेत, भारत सरकारनंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहे. 22 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून पुढे स्थगिती कायम ठेवायची की उड्डाणं सुरु करायची हा निर्णय होणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

केजरीवाल, गहलोत यांची विमान उड्डाणं रद्द करण्याची मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सर्व आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं तातडीन रद्द करावी, अशी मागणी सरकारकडे केली. आरोग्य मंत्रालयानं आज उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. त्यात केजरीवाल आणि गहलोत यांच्या मागणीनंतर विचार करण्यात आला. मात्र, सर्व उड्डाण रद्द करण्याऐवजी ब्रिटनहून येणारी उड्डाणं रद्द करण्यात आली. (New Strain of Coronavirus in UK: know so far All Update about new coronavirus)

विमानतळांवर कोरोनाची RT-PCR टेस्क बंधनकारक

भारतातील सर्व विमानतळांवर ब्रिटनहून येणाऱ्या नागरिकांनची RT-PCR टेस्ट केली जाणार आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. नागरिक उड्डयन मंत्रालयानं कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर हा नियम लागू केला आहे. 22 डिसेंबरपर्यंत किंवा त्याआधी भारतात आलेल्या विमानांतील सर्व प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. शिवाय त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल. (New Strain of Coronavirus in UK: know so far All Update about new coronavirus)

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

(New Strain of Coronavirus in UK: know so far All Update about new coronavirus)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.