गाफिल राहू नका, ऐन दिवाळीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री; किती घातक वाचा!

या व्हेरिएंटची लक्षणेही कोव्हिड 19 सारखी आहेत. अंगदुखी हे या व्हेरिएंटचे मुख्य लक्षण आहे. त्याशिवाय खोकला, सर्दी या नव्या व्हेरिएंटचे सब लक्षणे आहेत.

गाफिल राहू नका, ऐन दिवाळीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री; किती घातक वाचा!
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री; किती घातक वाचा!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 12:37 PM

मुंबई: कोरोना संसर्ग संपला असं वाटत असतानाच आता कोरोनाच्या (corona) नव्या व्हेरिएंटने राज्यात एन्ट्री केली आहे. महाराष्ट्रासह केरळातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबईत (mumbai) गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 150 रुग्ण सापडले आहेत. गेल्या पाच दिवसात सरासरी दहा लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. शुक्रवारी राज्यात 477 रुग्ण सापडले. त्यातील 178 रुग्ण मुंबईतील होते. महाराष्ट्रात कोव्हिडचा बी बी सब-व्हेरिएंट (XBB sub variant)चाही रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे दिवाळी आधी आणि नंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हिवाळ्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचं मुंबईतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.मुंबईत एन्फ्ल्यूएंजा सारख्या आजारांवर लक्ष ठेवून असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. कारण हा संसर्गजन्य रोग आहे. नुसत्या शिंकण्यानेही हा आजार पसरतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. काही लोक कोरोना संक्रमित असू शकतात. त्यांच्यामुळेही हा आजार पसरू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोव्हिड झालेल्यांच्या संख्येतील वाढ आणि घट गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. जोपर्यंत नवा व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग कमी राहील. कोरोनामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. पण सावध राहिलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे. जर कुटुंबात कोणी आजारी असेल तर त्याला मास्क लावायला सांगा. कुणाची इम्युनिटी कमी असेल तरीही त्याला मास्क लावायला सांगा, असं कोव्हिड टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं. डॉ. पंडित यांनी आजतकशी संवाद साधला होता.

ऑमिक्रॉन स्पॉन नावाचा एक नवीन व्हेरिएंट आहे. तांत्रिकदृष्ट्या बीए 5.1.7 आणि बीएफ 7 नाव असं त्याला देण्यात आलं आहे. हा व्हेरिएंट पहिल्यांदा चीनच्या मंगोलियात आढळला. गेल्या दोन आठवड्यात अमेरिकेत हा व्हेरिएंट 0.8 ते 1.7 टक्क्यांनी वाढला आहे. यूके, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या यूरोपीय देशात या व्हेरिएंटची जवळपास 15 ते 25 टक्के प्रकरणं दिसून आली आहेत, अशी माहिती फरिदाबादच्या डॉक्टर चारु दत्त आरोडा यांनी सांगितलं.

या व्हेरिएंटची लक्षणेही कोव्हिड 19 सारखी आहेत. अंगदुखी हे या व्हेरिएंटचे मुख्य लक्षण आहे. त्याशिवाय खोकला, सर्दी या नव्या व्हेरिएंटचे सब लक्षणे आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.