लठ्ठपणा वाढल्याने होतात अनेक आजार, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावाची पद्धत
जगभरात लठ्ठपणाची समस्या वाढत असून त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदय विकार या आजारांचा धोका वाढत आहे.
नवी दिल्ली: जगभरातील अनेक लोकांमध्ये लठ्ठपणाची (obesity) समस्या वाढत आहे. खराब जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव ( lack of exercise) यामुळे लोकांना लठ्ठपणाचा त्रास सहन कराव लागत आहे. लठ्ठपणामुळे हृदय रोगाचे (heart disease) प्रमाणही वाढत आहे. लहान वयातच मुलांचे वजन अधिक वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढत आहे.
लठ्ठपणामुळे संधिवात आणि कॅन्सर सारखे रोग देखील होऊ शकतात. येत्या 10 वर्षात भारतात लठ्ठपणा 20 टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ डॉक्टर कमलजीत सिंह यांच्या सांगण्यानुसार, शहरी भागातील लोकांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांची शारीरिक हालचाल अतिशय कमी झाली आहे आणि त्यांचे आहारावरही नियंत्रण नाही, त्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करून घेतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, मात्र तरीही अनेक जणांना त्याचा काही फायदा होत नाही. तरूण पिढी आणि लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे.
लहान मुलांमध्ये वाढत्ये लठ्ठपणाची समस्या
डॉ.सिंग यांच्या सांगण्यानुसार, गेल्या काही वर्षांत फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याचा ट्रेंड अथवा प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा वाढत आहे. फास्ट फूड खाण्याच्या या सवयीमुळे अनेकांना लहान वयातच मधुमेह झाल्याचे दिसून येत आहेत. वजन वाढल्याने मुलांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
टाईप- 2 मधुमेहामुळे मुलांची किडनी आणि यकृतावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे काही वेळा लहान वयातच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
यकृतामध्ये (लिव्हर) होऊ शकतो संसर्ग
लठ्ठपणामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. त्यामुळे यकृताच्या कार्यावरही परिणाम होतो, तसेच पचनाचे आजार होतात आणि मुलांचा योग्य विकास होऊ शकत नाही. अनेक प्रकरणांमध्ये, लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो. फास्ट फूड किंवा जंक फूडमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही अधिक वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका असतो.
लठ्ठपणावर असे ठेवा नियंत्रण
– फास्ट फूड अथवा जंक फूडचे सेवन करू नये.
– लहान मुलांना बाहेर जाऊन (मैदानावर) खेळण्यास प्रोत्साहित करावे.
– सर्वांनीच दिवसभरात कमीत कमी अर्धा तास तरी कोणताही व्यायाम जरूर करावा.
– डाएट करत असाल तर आहारात फॅटचे प्रमाण कमी करावे आणि प्रोटीन्स व व्हिटॅमिन्सचे सेवन अधिक करावे.
– डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही औषधाचे सेवन करू नये.