कोरोनाचा ‘S’ Gene फॅक्टर नेमका काय? ओमिक्रॉनचा संसर्ग शोधण्यासाठी महत्त्वाची पायरी

ओमिक्रॉनचा संसर्ग वेगात होत आहे. जगभरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी रुग्णाला ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय की नाही हे पाहाण्यासाठी एस जीन (S Gene ) ड्राप आऊट झालाय की नाही हे तपासणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.

कोरोनाचा 'S' Gene फॅक्टर नेमका काय? ओमिक्रॉनचा संसर्ग शोधण्यासाठी महत्त्वाची पायरी
कोरोना व्हायरस फोटो
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 10:31 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (Corona) ओमिक्रॉनचं (New Omicron Variant) संकट हळू हळू वाढू लागलं आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगात होत आहे. जगभरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी रुग्णाला ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय की नाही हे पाहाण्यासाठी एस जीन (S Gene ) ड्राप आऊट झालाय की नाही हे तपासणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. याद्वारे विषाणूमध्ये एस जीन आहे की नाही तपासलं जाणार आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय की नाही हे तपासण्यासाठी एस जीन फॅक्टर नेमका काय हे पाहावं लागणार आहे.

भारतात महाराष्ट्रासह अनेक राज्यानी परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस जीन (S Gene) फॅक्टरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील जगभरातील प्रयोग शाळा आणि जिनोम सिक्वेन्सिंग करणाऱ्या वैज्ञानिक संस्थांना एस जीन फॅक्टरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं ओमिक्रॉन वेरिएंट किती वेगानं संक्रमित होतो हे तपासलं जाणार आहे.

एस जीनवर जागतिक आरोग्य संघटनेंचं मत काय?

जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी आवश्यक किट विकसित केलं जात असल्याचं सांगितलं. तोपर्यंत जिनोम सिक्वेन्सिंगची मदत घ्यावी लागणार आहे. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये RNaseP आणि बीटा अॅक्टिन असणं आवश्यक आहे. मात्र, आरटीपीसीआरमध्ये एस जीन चाचणी केल्यास आणि त्यामध्ये एस जीन टार्गेट फेल्युअर असल्यास ओमिक्रॉन वेरिएंट असल्याचं समजेल, असं सांगण्यात आलं आहे.

जिनोम सिक्वेन्सिंगपूर्वी संसर्ग ओळखण्याचा पर्याय

डॉ. डांग लॅब्सचे डॉ. नवीन डांग यांनी एएनआयशी बोलताना ओमिक्रॉन ओळखण्यासाठी संसर्ग झालेल्या वक्तीच्या नमुन्यामध्ये एस जीन नसणं हा एक निदर्शक असल्याचं म्हटलं आहे. आरटीपीसीआरमध्ये एस जीन टार्गेट फेल्युअर टेस्ट केल्यास आणि त्यामध्ये ती मिसींग असल्यास ओमिक्रॉन संसर्ग झाल्याचं स्पष्ट होतं. जिनोम सिक्वेन्सिंगपूर्वी ओमिक्रॉन ओळखण्याचा पर्याय असल्याचंही ते म्हणाले. आरटीपीसीआर टेस्टमध्ये यापूर्वी ई, एन, आरडी आरपी जीन ची चाचणी केली जात होती. यामधील कोणताही जेन्स पॉझिटिव्ह आढळल्यास कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट करण्यात येत होतं. एस जीन टेस्ट ही ओमिक्रॉन झाल्याची निदर्शक असल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे.

इतर बातम्या:

हुश्श! दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह, औरंगाबादला दिलासा, आज आणखी 18 जणांचे अहवाल येणार!

Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना

Omicron Variant what is s gene drop out test which indication new variant of corona with RTPCR Test

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.