55 टक्के मुलांमध्ये ‘ऑनलाईन’चं दुखणं, डोकेदुखी, डोळेदुखी आणि झोपेच्या समस्यांनी बच्चे कंपनी परेशान: सर्व्हे
कोरोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये बंद पडली. हे संकट कधी संपेल याची काहीच शाश्वती नसल्याने ऑनलाई क्लास ही संकल्पना पुढे आली. (Online classes: 55 Percent Students Report Health Issues)

नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये बंद पडली. हे संकट कधी संपेल याची काहीच शाश्वती नसल्याने ऑनलाई क्लास ही संकल्पना पुढे आली. मात्र, त्याचे साईड इफेक्ट्स समोर आले आहेत. एका सर्व्हेनुसार, ऑनलाईन क्लासेसमुळे 55 टक्के लहान मुलांमध्ये डोकेदुखी, डोळेदुखी आणि झोपेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या निर्माण झालेले हे सर्व विद्यार्थी इयत्ता 4 थी ते 12 वीपर्यंतचे आहेत, असं सर्व्हेक्षणात म्हटलं आहे. (Online classes: 55 Percent Students Report Health Issues)
उत्तर प्रदेशातील लखनऊच्या स्प्रिंग डेल कॉलेज चेन ऑफ स्कूलने हा सर्व्हे केला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण 4454 विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. यात विविध शाळांमधील 3300 विद्यार्थी, एक हजार पालक आणि 154 शिक्षकांना ऑनलाईन क्लासेसचे फायदे आणि नुकसानीची माहिती विचारण्यात आली. त्यातून फायदे कमी आणि नुकसानच अधिक दिसून आल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाचे मुद्दे
>> या सर्व्हेत 54 ते 58 टक्के तरुणांनी त्यांना दृष्टीदोष झाल्याचं सांगितलं. काहींनी पाठीचा त्रास, डोकेदुखी, थकवा आणि लठ्ठपणा आदी समस्या जाणवत असल्याचं सांगितलं.
>> 50 टक्के विद्यार्थ्यांनी तणावाखाली असल्याचं सांगितलं. तर, 22.7 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांनी निद्रानाशाचा त्रास उद्भवल्याचं सांगितलं. 65 विद्यार्थ्यांनी मोबाईलवरून ऑनलाईन क्लास अटेंड करताना टेक्निकल आणि नेटवर्कच्या समस्या निर्माण होत असल्याचं सांगितलं.
>> 45-47 टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि वर्गातील सहकाऱ्यांशी संवाद साधण्यात अडचणी येत अस्लयाचं सांगितलं. आम्ही सर्व एकमेकांना एकसाथ पाहू शकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यात कॉन्फिडन्स कमी झाल्याचं सांगितलं. तसेच मोटिव्हेशन मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
फायदेही
हे काही नुकसान असतानाच काही फायदेही झाले आहेत. ऑनलाईन क्लासेसमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे. 60 टक्के विद्यार्थ्यांच्या मते अभ्यासासह त्यांना अतिरिक्त वेळही मिळत आहे. त्यामुळे मैदानात खेळणे, आर्ट आणि क्राफ्ट सारख्या गोष्टींकडे लक्ष देता येत आहे. त्याशिवाय कुटुंबीताल लोकांशी चांगल्याप्रकारे बॉन्डिंगही झाल्याचं या सर्व्हेक्षणातून दिसून आलं आहे.
हे करा
लहान मुलं ऑनलाईन क्लाससाठी फोनचा अधिक वापर करत असल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी वारंवार डोळे धुतले पाहिजे. दिवसातून 4-5 वेळा डोळ्यावर पाणी मारावे. तसेच डोळेदुखी, डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, अंधूक दिसने आदी समस्या निर्माण झाल्यास अलर्ट व्हा. हे डिजीटल आय स्ट्रेनची लक्षणे आहेत. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Online classes: 55 Percent Students Report Health Issues)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 July 2021 https://t.co/86BidTxNg0 #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2021
संबंधित बातम्या:
गर्भधारणेदरम्यान चालण्याचे बरेच फायदे , पण ‘या’ गोष्टींची काळजी घेणंही खूप महत्वाचं!
Benefits Of Pine Essential Oil : एसेन्शियल तेल आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक!
(Online classes: 55 Percent Students Report Health Issues)